Hiraman Khoskar On Dhangar Reservation : राज्यात विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. राजकीय पक्षाचे नेते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. एकीकडे महायुतीच्या नेत्यांचे दौरे आणि दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे दौरे असं चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. मात्र, असे असतानाच राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांचं उपोषणही सुरु आहे. यातच आता धनगर आरक्षणाचा मुद्दाही तापला आहे. मात्र, धनगर समजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी विरोध केला आहे. एवढंच नाही तर त्यांनी राजीनामा देण्याचा इशाराही दिला आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास आणि आमच्या मागण्या मान्य न झाल्यास मी लगेच राजीनामा देणार असल्याचं हिरामण खोसकर यांनी म्हटलं आहे. ते टिव्ही ९ मराठीशी बोलत होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा