सिंधुदुर्ग डंपर आंदोलनप्रकरणी कणकवली न्यायालयाने काँग्रेस आमदार नितेश राणे यांना १० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच, ३८ कार्यकर्त्यांनाही पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
डंपर मालकांनी शनिवारी सकाळापासूनच त्यांच्या मागण्यांसाठी सिंधुदुर्ग-गोवा महामार्गावरील वाहतूक रोखून धरली होती. पोलीस आणि महसूल विभागाच्या कारवाईचा त्रास होत असल्याचे सांगत डंपर मालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंदर्भात तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली होती. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून दुपारच्या सुमारास सर्व डंपर मालकांचा जमाव नितेश राणेंच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला. यावेळी पोलिसांनी जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट तोडून हा सर्व जमाव आत शिरला. यानंतर या आंदोलनाचे नेतृत्त्व करणाऱ्या आमदार निलेश राणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले.
नितेश राणे यांना १० मार्चपर्यंत पोलीस कोठडी
३८ कार्यकर्त्यांनाही पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 06-03-2016 at 17:59 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress mla nitesh rane and 38 other party workers get police custody till march