कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना जीभ घसरली आहे. आपल्या देशात मोदीबाबा नावाचा डेंग्यूचा मोठा डास आला आहे अशा शब्दांत त्यांनी मोदींवर टीका केली आहे. सोलापूरमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आपल्या देशात सर्वात मोठा डेंग्यूचा डास आला आहे, त्यांचं नाव आहे मोदीबाबा, फवारणी करुन या डासाला पुढच्या वर्षी हाकलून लावायचं आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना आजार होतोय असं प्रणिती शिंदेंनी म्हटलं आहे.

‘मोदींना खोटं बोलण्याची सवय लागली आहे. 15 लाख जमा करुन देतो असं म्हणाले होते, कुठे गेले ते पैसे. नोटाबंदीमुळे सर्वसामन्यांना फटका बसला. मोदींना ना बहिण आहे, बायको आहे ना मुलगी…त्यामुळे त्यांना महिलांना होणाऱ्या त्रासाबद्दल कळणार नाही. आई आहे पण नोटाबंदीवेळी तिला रांगेत उभं केलं ते पण फोटोसाठी. जग फिरतात पण कधी शेतकऱ्यांमध्ये येऊन त्यांची परिस्थिती पाहत नाही’, असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे.

विशेष म्हणजे यावेळी त्यांनी सोलापूरचे खासदार शरद बनसोडेंचा भाषणात बेवडा म्हणून उल्लेख केला. काँग्रेसच्या काळातील केलेल्या कामाचं उद्घाटन दोन्ही मंत्री आणि बेवडा खासदार करत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

Story img Loader