शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडेंनी एका महिला पत्रकाराला आधी कुंकू लाव, मगच प्रतिक्रिया देईल असं वक्तव्य केलं. त्यावरून संभाजी भिडेंवर जोरदार टीका होत आहे. आता सोलापूरच्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनीही संभाजी भिडेंचा खरपूस समाचार घेतला. “कोणी काय घालवं, कोणी काय केलं तर जास्त देशप्रेम हे आम्हाला शिकवू नका,” असं मत प्रणिती शिंदेंनी व्यक्त केलं. तसेच या मुद्द्यावर भाजपावरही निशाणा साधला. त्या गुरुवारी (३ नोव्हेंबर) सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होत्या.

प्रणिती शिंदे म्हणाले, “संभाजी भिडे आणि भाजपाचे लोक महिलांचं वस्तूकरण करत (ऑब्जेक्टिफिकेशन) करत आहेत. याचा आम्ही निषेध करतो. ते प्रत्येक महिलेला एक वस्तू म्हणून बघतात. महिलेने काय घालावं, तिने कसं वागावं हे सांगणारे हे लोक कोणी नाही. आमची संस्कृती, देशप्रेम आमच्या ह्रदयात आहे. ते आम्हाला कोणालाही दाखवायची गरज नाही. ही गरज ना महिलांना आहे, ना पुरुषांना.”

Praniti Shinde Criticized Devendra Fadnavis
Praniti Shinde : प्रणिती शिंदेंचा आरोप, “देवेंद्र फडणवीस ईव्हीएम सीएम, महाराष्ट्र दिवाळखोरीच्या…”
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
chaturang article on revolutionary tone of Indian womens liberation
भारतीय स्त्रीमुक्तीचा क्रांतिकारी सूर
Woman breaks glass door of society after catching security guard sleeping on dusty in greater noida shocking video viral
शेवटी तीही माणसंच! सुरक्षा रक्षकाचा लागला डोळा; अद्दल घडवण्यासाठी महिलेनं उचललं टोकाचं पाऊल, VIDEO पाहून सांगा हे कितपत योग्य?
Uday Samant On Shivsena Thackeray group
Uday Samant : “ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार अन् काँग्रेसचे ५ आमदार…”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “उद्या पहिला ट्रेलर…”
Shocking video in mumbai virar local train women fight video viral on social media spirit of mumbai
“आता जीव जाईल तिचा” विरार लोकलमध्ये महिलांनी अक्षरश: हद्द पार केली; भयंकर VIDEO पाहून विरार लोकलमध्ये चढताना १०० वेळा विचार कराल
Saamana critiques Shiv Sena leadership on Balasaheb Thackeray’s birth anniversary, targeting the Shinde faction.
“शिवसेनारूपी कवचकुंडले मोडून ती तोतया शिंदेंच्या हाती सोपवली”, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिनी ठाकरे गटाची टीका
Gashmeer Mahajani
“नाळ जोडली गेलेली…”, गश्मीर महाजनी महिला चाहत्यांबद्दल म्हणाला, “लहानपणापासून माझ्यावर महिलांचे…”

व्हिडीओ पाहा :

“महिलेने कसं वागावं हे सांगायचा त्यांना अजिबात अधिकार नाही”

“कोणी काय घालवं, कोणी काय केलं तर जास्त देशप्रेम हे आम्हाला शिकवू नका. त्यांचं पक्षप्रेम आहे, आमचं खरं देशप्रेम आहे. एका महिलेला काय घालावं आणि कसं वागावं हे सांगायचा त्यांना अजिबात अधिकार नाही. महिलांचं वस्तूकरण सुरू आहे ते त्यांनी ताबोडतोब बंद करावं. आम्ही या गोष्टीचा निषेध करतो,” असं मत प्रणिती शिंदेंनी व्यक्त केलं.

हेही वाचा : “संभाजी भिडेंना क्लिनचिट देण्यास मदत केली”, प्रकाश आंबेडकरांच्या आरोपावर जयंत पाटलांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

“…म्हणूनच भाजपा शासनात महिलांवर अत्याचार होतात”

“मानसिकेत बदल नव्हता, महिलांचं वस्तूकरण होतं म्हणूनच भाजपा शासनात महिलांवर अत्याचार होतात. ते महिलांचे काम, कर्तुत्व बघत नाहीत, फक्त चेहऱ्यावर जातात. त्यांना वस्तू म्हणून बघितलं जातं आणि महिलांवर अत्याचार करतात,” असा गंभीर आरोप प्रणिती शिंदे यावेळी केला.

Story img Loader