सोलापूर : मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका सोलापूर जिल्ह्यात राजकीय पक्षांचे नेते व लोकप्रतिनिधींना बसत असून त्याची झळ काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा, आमदार प्रणिती शिंदे यांनाही सोसावी लागली. मंगळवेढा भागात गावभेटीवर आल्या असताना आमदार प्रणिती शिंदे यांना मराठा आरक्षण आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यांना गावात सभा घेण्यात तीव्र विरोध करून परत पाठविण्यात आले.

आगामी लोकसभा निवडणुकांचे नगारे वाजत असताना सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या आमदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने मंगळवेढा तालुक्यात गावभेट दौरा आखला होता. या तालुक्यातील २४ गावे पाण्याविना तहानलेली समजली जातात. त्याबद्दल स्थानिक गावक-यांमध्ये प्रचंड अस्वस्थता दिसून येते. यातूनच आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा स्थानिक गावकऱ्यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रणिती शिंदे यांनी हाच कळीचा मुद्दा पुढे करून विधिमंडळ अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधले होते. त्यानंतर बुधवारी त्या मंगळवेढा तालुक्यातील गावांना भेटी देण्यासाठी आल्या होत्या. पाटखळ येथून गावभेट सुरू करीत असताना गावातील सुमारे दोनशे तरुणांनी मराठा आरक्षण आंदोलनाच्या प्रश्नावर त्यांना रोखले. आमदार प्रणिती शिंदे यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता मराठा आरक्षण आंदोलक ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हते. तेव्हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी तेथील खुर्च्या व इतर साहित्य दुसऱ्या ठिकाणी सभामंडपात हलवून सभा घेण्याचा प्रयत्न केला. परंतु तेथेही विरोध झाला. त्यामुळे शेवटी आमदार प्रणिती शिंदे यांना गावभेट दौरा करणे शक्य झाले नाही. पाटखळ, खडकी, नंदेश्वर, भोसे, महमदाबाद, लोणार, पडोळकरवाडी, हुन्नूर, मारोळी, चिक्कळगी, रड्डे, सिद्धनकेरी, जालिहाळ, हाजापूर आदी गावांना भेटी देण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे आल्या होत्या.

Devendra fadnavis meet amit shah
नाराज एकनाथ शिंदेंची भाजपकडून मनधरणी, फडणवीस – शहा चर्चेनंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Eknath Shinde
Eknath Shinde : शिंदे गटाची महत्त्वपूर्ण बैठक संपल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
cm Eknath shinde
शिवसेनेत फिरती मंत्रीपदे; इच्छुक, नाराजांना थोपविण्यासाठी शिंदे यांचा तोडगा
Eknath Shinde is now Deputy CM and second ranked leader in Devendra Fadnavis government
एकनाथ शिंदेंचे सरकारमधील स्थान दुसऱ्या क्रमांकाचे, शिंदेंना ‘देवगिरी’
Despite success in the assembly elections the future is challenging for Eknath Shinde
विधानसभा निवडणुकीतील यशानंतरही एकनाथ शिंदे यांच्यासाठी भविष्यकाळ आव्हानात्मक? दिल्लीतील ‘महाशक्ती’चा पाठिंबा अजूनही? 
Ladki Bahin Yojana Updates By Eknath Shinde
Ladki Bahin Yojana : शिंदे दादा आमचा डिसेंबरचा हप्ता कधी देणार? उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच लाडक्या बहिणीचा एकनाथ शिंदेंना सवाल
devendra fadnavis takes oath as chief minister of maharashtra for the third time
तीन ताल… फडणवीस तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी; शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, पवारांचा सहावा विक्रमी शपथविधी

हेही वाचा – गडकरींविरोधात तुल्यबळ उमेदवार हवा, तरच नागपुरात…. वाचा काय म्हणताहेत काँग्रेस नेते?

हेही वाचा – निवडणुका आल्‍या की विशिष्‍ट धर्म निशाण्‍यावर, आमदार बच्‍चू कडू यांची राणा दाम्‍पत्‍यावर टीका

यापूर्वी मराठा आरक्षण आंदोलकांनी सोलापुरात भाजपच्या विजय देशमुख व सुभाष देशमुख या दोन्ही आमदारांसह काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्याही निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळी परगावी असलेल्या आमदार शिंदे यांनी आंदोलकांशी दूरभाष्य प्रणालीद्वारे संवाद साधला होता. परंतु त्यावेळी वाद होऊन गोंधळ उडाला होता. त्यानंतर अलिकडे पंढरपूर तालुक्यातील पेनूर येथे माढ्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र तथा सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनाही मराठा आरक्षण आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते.

Story img Loader