Premium

“प्रसिद्धीसाठी शिंदे सरकारची दिवसाला २.८० कोटींची उधळपट्टी”, काँग्रेसचा आरोप; शासकीय आदेश केला शेअर!

सतेज पाटील म्हणतात, “ऐन आचारसंहितेच्या काळात जनतेच्या पैशाचा वापर पक्षाच्या प्रचारासाठी केला जाणार आहे. ही गोष्ट मुक्त अन निष्पक्ष निवडणुकीसाठी अत्यंत घातक आहे.”

satej patil on cm eknath shinde
काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी शेअर केला शासकीय अध्यादेश (फोटो – लोकससत्ता ग्राफिक्स टीम)

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसल्याचं दिसून येत आहे. राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांमध्ये स्वबळ, युती, जागावाटप, उमेदवार निश्चिती अशा अनेक पातळ्यांवर चर्चा किंवा निर्णय होत आहेत. भाजपानं राष्ट्रीय स्तरावरील १९५ उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली आहे. मात्र, त्यात महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचं नाव नाही. राज्यात निवडणुकांच्या निमित्ताने आघाडी व युतीतील जागावाटपावर सध्या चर्चा चालू असतानाच काँग्रेसनं शिंदे सरकारवर गंभीर आरोप केला आहे. यासंदर्भात थेट शासकीय अध्यादेशच एक्सवर (ट्विटर) शेअर केला आहे.

“एकीकडे कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन नाही. आशा सेविका तुटपुंज्या मानधनासाठी संपावर जात आहेत. पण सरकार मात्र प्रसिद्धीला हपापले आहे”, अशा शब्दांत काँग्रेसचे विधानपरिषदेचे सदस्य सतेज पाटील यांनी एकनाथ शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे. यासाठी पुराव्यादाखल सतेज पाटील यांनी ४ मार्च रोजी राज्य सरकारने काढलेल्या जीआरची प्रतच सोबत जोडली आहे.

Kolhapur Chandgad Newly Elected MLA Public Rally fire Incident
VIDEO : कोल्हापुरात आमदाराच्या विजयी मिरवणुकीवेळी आगीचा भडका, गुलाल उधळताना दुर्घटना, काही महिला जखमी
maharshtra assembly elections 2024 Veteran leaders from Sangli defeated in election
सांगलीत दिग्गज नेते निकालाने जमिनीवर !
Assembly elections 2024 Islampur constituency Jayant Patil defeat sangli news
इतना सन्नाटा क्यो है भाई? इस्लामपूरमध्ये विजयानंतरही स्मशानशांतता
maharashtra Assembly Election 2024 South Maharashtra Mahayuti wins Hindutva propaganda print politics news
दक्षिण महाराष्ट्र: वाटचाल भगव्याकडे..
Maharashtra next cm
संख्याबळाला मान की शिंदेंचा सन्मान?
Maharashtra vidhan sabha latest marathi news
महायुती ‘सव्वादोनशे’र!
Eknath Shinde
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्व विजयी उमेदवारांबरोबर बैठक, मित्र पक्षाबरोबर चर्चा करण्याबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
Maharashtra Assembly Election 2024 Final Results Party wise
Maharashtra Assembly Election Final Result : महाराष्ट्रात कोणाला किती जागा मिळाल्या? पाहा सर्व १४ पक्षांची अंतिम आकडेवारी

२० कोटी वर्तमानपत्रांवर तर २०.८ कोटी वृत्तवाहिन्यांवर?

आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये सतेज पाटील यांनी यासंदर्भातली आकडेवारी दिली आहे. “महाराष्ट्र शासनाने लोकसभेच्या प्रचाराच्या हेतूने एका महिन्याच्या प्रसिद्धीसाठी ‘विशेष माध्यम आराखडा’ मंजूर केला आहे. यामध्ये ३० दिवसांसाठी तब्बल ८४ कोटी रुपये म्हणजेच दिवसाला २ कोटी ८० लाख रुपये माध्यमांतील प्रसिद्धीवर उधळले जाणार आहेत”, अशी पोस्ट सतेज पाटील यांनी केली आहे.

पुढे सतेज पाटील यांनी सविस्तर आकडेवारी दिली आहे. “या खर्चाची आकडेवारी पुढीलप्रमाणे विभागलेली आहे: वर्तमानपत्रे – २० कोटी रुपये, वृत्तवाहिन्या – २० कोटी ८० लाख रुपये, डिजिटल होर्डिंग-एलईडी – ३७ कोटी ५५ लाख रुपये, सोशल मीडिया – ५ कोटी रुपये”, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

“आचारसंहितेच्या काळात सरकारी पैशातून प्रचार”

दरम्यान, “ऐन आचारसंहितेच्या काळात जनतेच्या पैशाचा वापर पक्षाच्या प्रचारासाठी केला जाणार आहे”, असा आरोप सतेज पाटील यांनी केला आहे. “ही गोष्ट मुक्त अन निष्पक्ष निवडणुकीसाठी अत्यंत घातक असून निवडणूक आयोगाने यावर आळा घालावा आणि ही प्रसिद्धी मोहीम तात्काळ थांबवावी अशी मी मागणी करतो”, असंही सतेज पाटील यांनी या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Congress mlc satej patil alleges cm eknath shinde expenditure on media coverage pmw

First published on: 07-03-2024 at 08:59 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या