राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. मुंबईत लवकरच पालिका निवडणुकांची तयारी सुरू होणार असून त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. त्यामुळे राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एकीकडे शिंदे गट आणि भाजपानं मुंबईसोबतच आगामी सर्वच निवडणुकांमध्ये एकत्र लढण्याचा निर्धार व्यक्त केला असताना काँग्रेस खासदारानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाजपाशी युतीवरून खोचक शब्दांत टीकास्र सोडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेस खासदार मल्लिकार्जुन खर्गे आज पक्षाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीत काँग्रेसचे अनेक नेतेमंडळी आणि खासदार त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एकत्र जमल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगडी यांनी टीव्ही ९ शी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकास्र सोडलं आहे. यावेळी त्यांनी मल्लिकार्जुन खर्गेंच्या राजकीय कारकिर्दीचा गौरवदेखील केला.

“हे काँग्रेसच्या अंतर्गत लोकशाहीचं सौंदर्य”

“मल्लिकार्जुन खर्गे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. ५० वर्षांची त्यांची राजकीय कारकिर्द आहे. हा त्यांचा प्रवास संघर्षमय राहिला आहे. दलित परिवारातून आलेल्या एका जमिनीवरच्या व्यक्तीला राष्ट्रीय अध्यक्षपदी बसवणं हे काँग्रेसच्या अंतर्गत लोकशाहीचं सौंदर्य आहे”, असं प्रतापगडी यावेळी म्हणाले.

“त्यांचे २२ आमदार कुठे जाणार हे पाहिलं पाहिजे”

दरम्यान, यावेळी बोलताना इम्रान प्रतापगडी यांनी महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं. “आम्ही मुंबईत पूर्ण ताकदीने लढणार आहोत. आधी हे पाहिलं पाहिजे की सध्याच्या सरकारमधले २२ आमदार कुठे जाणार आहेत. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका तर फार लांबची बाब आहे”, असं इम्रान प्रतापगडी म्हणाले.

“…मला तर आता मळमळायला लागलं आहे”, आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला

“भाजपानंच त्यांची ही अवस्था केलीये”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याबाबत विचारणा करताच इम्रान प्रतापगडी यांनी एकनाथ शिंदेंना खोचक टोला लगावला. “भारतीय जनता पक्षानं त्यांची अशी अवस्था करून ठेवली आहे. येत्या काही दिवसांमध्ये भाजपा त्यांची अशी अवस्था करून ठेवेल की ते चारधामच्या यात्रेला निघून जातील”, असा टोला प्रतापगडींनी यावेळी लगावला.