आज १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे. आजचा दिवस हा प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी लोक आपल्या साथीदारासोबत घालवतात आणि प्रेम व्यक्त करतात. याच व्हॅलेंटाईन डे निमित्त काँग्रेसच्या खासदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी केलेलं ट्वीट सध्या चर्चेत आहे. प्रज्ञा सातव या दिवंगत काँग्रेस खासदार डॉ. राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. गेल्यावर्षी करोनामुळे १६ मे रोजी पुण्यात राजीव सातव यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतरचा हा पहिलाच व्हॅलेंटाईन डे असून प्रज्ञा सातव यांनी राजीव सातव यांच्याबद्दलचं प्रेम त्यांच्या ट्वीटमधून व्यक्त केलंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रज्ञा सातव यांनी लिहिलंय की, “प्रिय राजीव जी, या व्हॅलेंटाईन डे ला तुम्ही कुठेही असाल तरी मला तुम्हाला सांगायचे आहे की, मी कालही तुमच्यावर प्रेम करत होते. आजही मी तुमच्यावर प्रेम करते आणि मी उद्याही तुमच्यावर प्रेम करेन. मी कायम तुमच्यावर प्रेम करत राहीन.” यासोबत त्यांनी तीन रेड हार्ट इमोजी टाकले आहेत.

या ट्वीटमध्ये प्रज्ञा सातव यांनी पती राजीव यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. दरम्यान, राजीव आणि प्रज्ञा यांचं २००२ मध्ये लग्न झालं होतं. दोघांना दोन मुलं देखील आहेत. १९ वर्षांच्या संसारानंतर गेल्यावर्षी राजीव सातव यांचं करोनाने निधन झालं आणि या दोघांची ताटातूट झाली. आज प्रेमाच्या दिवशी प्रज्ञा सातव यांनी आपल्या पतीबद्दल प्रेम व्यक्त करत भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress mp pradnya satav emotional valentines day note for late husband rajeev satav hrc