काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींचा उल्लेख करत आक्षेपार्ह उल्लेख केल्यापासून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस त्यांच्यावर टीका करत आहेत. अमृता फडणवीस नाना पटोलेंचा उल्लेख नन्हे पटोले असा करत टोला लगावत आहेत. दरम्यान नाना पटोले यांनी टीव्ही ९ शी बोलताना अमृता फडणवीसांच्या या टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे.

“नॉटी नामर्द, बिगडे नवाब, नन्हे पटोले…”; अमृता फडणवीसांनी शेअर केला ‘१०० मार्कांचा पेपर’; म्हणाल्या…

International Mens Day
पुरुषाचं घर, घरचा पुरुष
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
rishi kapoor was scared of raj kapoor
वडील घरी आले की घाबरून लपायचो, ऋषी कपूर कारण सांगत म्हणालेले, “ते खोलीत…”
success story of Sindhu brothers who grows keshar with aeroponics method most expensive spice sells it for lakhs
भावांनी घरातच केली केशरची शेती, प्रगत तंत्रज्ञान वापरून मातीशिवाय हवेत वाढतात झाडे, वाचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास
devendra fadnavis criticize uddhav thackeray for making video of bag checking
“त्यांच्या आधी माझी बॅग तपासली, केवळ भांडवल…”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे टीकास्त्र
Who will understand the pain of parents
“आई वडिलांचे दु:ख कोण समजून घेणार” चिमुकल्याने सांगितले आई बाबांना वेळ देण्याचे दोन फायदे, VIDEO होतोय व्हायरल
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”

“…नन्हे पटोले … लाईलाज फफोले!”; नाना पटोले प्रकरणात अमृता फडणवीसांचीही उडी, मोदींना दिली सूर्याची उपमा

अमृता फडणवीसांनी ट्विटवरती नाना पटोले यांना नन्हे पटोले असा उल्लेख केला असून काही प्रश्न विचारले आहेत. ५०-५० मार्कांचे हे दोन प्रश्न अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडी सरकारमधल्या काही नेत्यांबद्दलचे आहेत.

काय आहे ट्वीट –

आपल्या ट्वीटमध्ये अमृता फ़डणवीस म्हणतात, “थोडक्यात उत्तर द्यावे …५० मार्क्स ; Naughty नामर्द, बिगड़े नवाब, नन्हें पटोले ….या जमाती एकत्रित कोठे पाहिल्या जाऊ शकतात ? रिक्त स्थानो की पूर्ति करो …५० मार्क्स !शराब नही होती ! हरामख़ोर का मतलब है और सुनने में आया है नामर्द है !”

नाना पटोलेंची प्रतिक्रिया –

नाना पटोलेंना जेव्हा अमृता फडणवीसांकडून तुमचा उल्लेख ‘नन्हे पटोले’ केला जात आहे यासंबंधी विचारण्यात आलं तेव्हा त्यांना अमृता फडणवीस आमच्या सुनबाई आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल आम्ही काहीचं बोलत नाही असं सांगितलं.

दरम्यान अमृता फडणवीसांच्या ट्वीटवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी पातळी सोडून बोलत असल्याची तक्रार केली आहे. तर “आपण टोकाची राजकीय टिपण्णी करून जनतेचा रोष ओढवून घेऊ नये, समाजोपयोगी कामं करत राहा, राजकीय टिपण्णी करू नये”, असा सल्लाही काही जणांनी दिली आहे. तर काही जणांनी मात्र त्यांच्या या ट्वीटवर समर्थनार्थ कमेंट्स केल्या आहेत.