राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात येऊन आता तीन महिने उलटले आहेत. या काळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालं. या काळात महाविकास आघाडीतील तिनही पक्ष वेगवेगळे होतील अशीही शक्यता वर्तवली गेली. मात्र, महाविकास आघाडी अजून कायम असून आता काँग्रेसकडून थेट सरकार बडतर्फीसाठी पावलं उचलण्यात येत असल्याचे संकेत कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत. ते गोंदियामध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकीकडे राज्यात भाजपा आणि शिंदे गट या सत्ताधाऱ्यांना मनसेच्या रुपात नवा मित्रपक्ष मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भात दोन्ही बाजूच्या नेतेमंडळींकडून करण्यात येत असलेली विधानं ही आगामी युतीचेच संकेत देत असली, तरी अद्याप यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिका निवडणुकांच्या दृष्टीने नवी समीकरणं मांडली जात आहेत. मात्र, दुसरीकडे राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं केलेलं प्रचंड नुकसान चर्चेचा आणि चिंतेचा विषय ठरलं आहे. यासंदर्भात आता विरोधकांनी आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे.

“ओला दुष्काळ जाहीर केला नाही तर..”

मधल्या काळात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ओला दुष्काळ सरकारने जाहीर न केल्यास दिवाळीत आक्रमक आंदोलन करणार असल्याची घोषणा केली होती. यासंदर्भात आता काँग्रेसकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. नाना पटोले यांनी मंगळवारी गोंदियामध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना थेट राज्यपालांकडे सरकार बडतर्फ करण्याची मागणी करणार असल्याचं सांगितलं आहे.

नागपूर : दुष्काळ जाहीर न झाल्यास दिवाळीत आंदोलन; नाना पटोले

काय म्हणाले नाना पटोले?

दिवाळीनंतर राज्यपालांची भेट घेणार असल्याचं नाना पटोलेंनी यावेळी सांगितलं. “शेतकरीविरोधी सरकार म्हणून या सरकारला बडतर्फ करायला हवं, अशी भूमिका आम्ही राज्यपालांकडे मांडणार आहोत. राज्यातलं सरकार शेतकरीविरोधी आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्यांची जबाबदारी राज्यातील ईडीच्या भाजपा सरकारची आहे, ही भूमिका घेऊन आम्ही दिवाळीनंतर राज्यपालांकडे जाणार आहोत”, असं नाना पटोले यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress nana patole slams cm eknath shinde devendra fadnavis meet governor after diwali 2022 pmw
Show comments