गेल्या अडीच वर्षांपासून अनेक वाद होऊन देखील अद्याप शाबूत असलेल्या महाविकास आघाडीमधील अंतर्गत वाद आता समोर येऊ लागले आहेत. नुकताच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर थेट पाठीत सुरा खुपसण्याचं काम केल्याचा आरोप केला आहे. आणि याला कारणीभूत ठरली आहे गोंदिया जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती सभापतीपदाची निवडणूक. या निवडणुकीत पटोले विरुद्ध पटेल अर्थात नाना पटोले विरुद्ध प्रफुल्ल पटेल हा वाद पुन्हा एकदा उघड झाला. त्यामुळे नाना पटोलेंनी त्यावरून आपल्या ट्विटर हँडलवर खरमरीत शब्दांत ट्वीट केलं असून थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर पाठीत सुरा खुपसल्याचा आरोप केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“कुरघोड्या सातत्याने सुरू आहेत”

नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातत्याने कुरघोड्या सुरू असल्याचा आरोप केला आहे. “मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादी काँग्रेस ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पाठीत सुरा खुपसण्याचे काम करीत आहे. आमच्या विरोधात त्यांच्या कुरघोड्या सातत्याने सुरू आहेत. याचा जाब आम्ही त्यांना नक्कीच विचारू”, असं ट्वीट नाना पटोले यांनी केलं आहे. या पार्श्वभूमीवर या दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू होण्याची शक्यता आहे.

“मैत्री प्रामाणिक आणि शत्रुत्व समोरून करावं”

दरम्यान, यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी आपली सविस्तर भूमिका स्पष्ट केली. “स्थानिक स्वराज्य संस्था महाविकास आघाडीच्या ताब्यात असाव्यात, अशी भूमिका ठरली होती. पण भंडारा-गोंदियात राष्ट्रवादीने भाजपासोबत हातमिळवणी करून पाठीत खंजीर खुपसला. भिवंडीतही आमचे १९ नगरसेवक राष्ट्रवादीत घेतले. मैत्री करायची तर प्रामाणिक करायची. शत्रुत्व करायचं तर ते समोरून केलं पाहिजे. सोबत राहून अशा प्रकारे वर्तन केलं जात असेल तर हे बरोबर नाही. मी हायकमांडशी चिंतन शिबिरात चर्चा करेन. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर ज्या प्रकारे राष्ट्रवादी आमच्यासोबत वागतेय, ते बरोबर नाही”, असं नाना पटोले म्हणाले.

“भाजपासोबत जायचंय हे एकदा सांगून टाका”

“आम्हाला एकदा त्यांनी सांगून द्यावं की त्यांना भाजपासोबत जायचंय. ते एकदा पहाटे गेलेच होते भाजपासोबत. आम्हाला त्याच्याशी घेणंदेणं नाही. पण सोबत राहून पाठीवर वार करण्याची भूमिका काँग्रेसला कधीही मान्य होऊ शकत नाही. या सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लागायला हवा ही भूमिका काँग्रेसची आहे”, असं देखील ते म्हणाले.

नेमकं भंडारा-गोंदियात काय घडलं?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी या जिल्ह्यात भाजपशी युती केली. त्यामुळे अनेक पंचायत समित्यांमध्ये संख्याबळ अधिक असूनही नानांच्या जिल्ह्यात काँग्रेसला सत्तेबाहेर राहावे लागले. याचा वचपा त्यांनी जि.प. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काढला. माजी आमदार चरण वाघमारे भाजपामध्ये नाराज होते. त्यांचा गट काँग्रेससोबत जाणार अशी चर्चा होती. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न भाजपाकडून झाला. पण वरिष्ठ नेत्यांचा दबाब झुगारून वाघमारे यांनी त्यांचा निर्णय कायम ठेवला. वाघमारे राष्ट्रवादीसोबत सत्तेत बसण्यास इच्छुक नसल्याने ते काँग्रेससोबत गेले.

नव्या समीकरणाने गोंदिया, भंडारा जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी

दुसरीकडे डॉ. परिणय फुके व खासदार मेंढे यांचा गट व राष्ट्रावादी काँग्रेस मिळून सत्ता स्थापनेचा प्रयत्न होता. या माध्यमातून जिल्ह्यातच पटोले यांची कोंडी त्यांना करायची होती. परंतु या प्रयत्नातही त्यांना वाघमारे यांची साथ लागणारच होती. यात त्यांना अपयश आले. उलट भाजपाचीच कोंडी झाली.

भंडाऱ्याच्या राजकीय खेळीचे पडसाद गोंदियात उमटले. तेथे काँग्रेसला सुरुंग लावण्याचा प्रयत्न भाजपा व राष्ट्रवादीचा होता. इथे भाजपाने राष्ट्रवादीशी युती करत जिल्हा परिषदेत सत्ता हस्तगत करून काँग्रेसची कोंडी केली. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे नाना पटोले यांच्याशी असलेले राजकीय वैर सर्वश्रुत आहे. पण राज्यात दोन्ही पक्ष एकत्र सत्तेत असताना येथे राष्ट्रवादीने भाजपाशी हातमिळवणी करणे अनेकांना खटकले आहे.