निवडणुका जवळ आल्या असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी किंवा काँग्रेस, कोणीही वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न करणे योग्य ठरणारे नाही. पूर्वी अशाच ‘गमती-जमती’ केल्यामुळे राज्याची सत्ता हातातून गेली होती, याची जाणीव ठेवली ठेवली पाहिजे, असा कानमंत्र वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी दिला. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका दोन्ही पक्षांनी एकत्रित लढविण्याचा निर्णय झाला आहे. हिंगोली लोकसभेची जागा काँग्रेसला हवी आहे. राज्यात कुठे तरी जागांची अदलाबदल शक्य आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादीची वेगळी चूल योग्य नाही-पतंगराव
निवडणुका जवळ आल्या असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी किंवा काँग्रेस, कोणीही वेगळी चूल मांडण्याचा
First published on: 18-11-2013 at 03:52 IST
TOPICSपतंगराव कदम
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress ncp should not depart patangrao kadam