महाविकास आघाडीमधील नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात बंड पुकारल्यानंतर ४० आमदारांच्या जोरावर राज्यात भाजपाच्या मदतीने नवं सरकार स्थापन केली. त्यानंतर आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीची घडी पुन्हा बसवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. उद्धव ठाकरेंनी एकत्र निवडणुका लढवण्यासंदर्भात भूमिका मांडल्यानंतर काँग्रेसने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलाय. यापूर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तिन्ही पक्षांनी एकत्र निवडणुका लढवण्याची भूमिका मांडली होती. त्यामुळे आता स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे गट आणि भाजपा असा सामना पहायला मिळण्याची शक्यात आहे.
नक्की पाहा >> Photos: २०२० मध्ये शिंदेंचाच होता विरोध अन् काल मुख्यमंत्री म्हणून त्यांनीच केली ‘या’ निर्णयाची घोषणा; BJP ला होणार मोठा फायदा
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा