शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली. तसेच यांची हाव भागत नसल्याचं म्हणत हे शिवसेना प्रमुखही व्हायचं म्हणतील, असं मत व्यक्त केलं. यावर भाजपा नेत्या चित्रा वाघांनी “काय ते प्रश्न, काय ती उत्तरं, काय ती घरातल्या घरातली मुलाखत. कौटुंबिक कार्यक्रम एकदम ओक्के,” असं म्हणत खोचक टोला लगावला. यावर महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका मुलाखतीचा जुना व्हिडीओ पोस्ट करत प्रत्युत्तर दिलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सचिन सावंत म्हणाले, “बरोबर आहे, मुलाखत पंतप्रधानांची घेतात तशी हवी. काय ते देशहिताचे प्रश्न, काय ती जनहिताची उत्तरे, काय ती पंतप्रधान निवासातील मुलाखत, राष्ट्रीय कार्यक्रम एकदम ओक्के.”

व्हिडीओत नेमकं काय?

सचिन सावंत यांनी पोस्ट केलेला व्हिडीओ अभिनेता अक्षय कुमारने घेतलेल्या पंतप्रधान मोदींच्या मुलाखतीचा एक भाग आहे. यात अक्षय कुमार मोदींना तुम्ही आंबा खाता का? खात असतील तर कापून खातात की चोखून खातात, असा प्रश्न विचारला आहे. यावर मोदी हसताना दिसत आहे.

हेही वाचा : Photos : “जो आपल्या कर्माने मरणार आहे, त्याला धर्माने मारू नका”, उद्धव ठाकरेंच्या भाषणातील २५ महत्त्वाचे मुद्दे, वाचा…

याशिवाय या व्हिडीओत अन्य एका मुलाखतीचा भाग आहे. ज्यात पत्रकार तुम्ही तुमच्या खिशात पैशांचं पाकिट ठेवतात का? असा प्रश्न विचारताना दिसत आहे.