रविवारी २५ जून रोजी नांदेडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात बोलताना भाजपा नेते गिरीश महाजन यांनी केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय ठरलं होतं. त्यावरून आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. गिरीश महाजनांच्या या वक्तव्यावर काँग्रेसकडून सचिन सावंत यांनी खोचक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये गिरीश महाजनांनी कबुली दिल्याचा उल्लेख सचिन सावंत यांनी केला आहे.

काय म्हणाले होते गिरीश महाजन?

राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी नांदेडमधल्या कार्यक्रमात बोलताना पूर्वी विदेशात भारतीयांना उधारीवाले लोक म्हणायचे, असं विधान केलं. “१५ दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान भारतात आले होते. ते एका बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले. त्यांनी पायाला हात लावून नमस्कार केला. मित्रांनो ही छोटी गोष्ट नाही. पूर्वीचा देश आठवा. त्यावेळी आम्ही विदेशात जायचो, तेव्हा कुठेही गेल्यावर देशाचं नाव भारत सांगितल्यावर लोक बारीक डोळे करायचे. हे उधारीवाले लोक, मागणारेच लोक आहेत असं म्हणायचे”, असं गिरीश महाजन म्हणाले.

Nitin Gadkari on Road Accidents
Nitin Gadkari: ‘मी तेव्हा माझे तोंड लपवतो’, नितीन गडकरींनी लोकसभेत बोलताना व्यक्त केली खंत
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
News About Parliament
BJP : उपराष्ट्रपती व्ही. पी. धनखड यांना हटवण्यासाठी विरोधकांचा गोंधळ, भाजपाने नेमकी काय खेळी केली?
russia ins tushil
रशियाने भारताला सुपूर्द केली क्षेपणास्त्राने सुसज्ज युद्धनौका; ‘आयएनएस तुशील’ काय आहे? भारतासाठी याचे महत्त्व काय?
Image of Zelensky
Russia Vs Ukraine War : “जोपर्यंत नाटोचे सदस्यत्व…”, झेलेन्स्की यांनी का केली युक्रेनमध्ये परदेशी सैन्य तैनात करण्याची मागणी?
Russia Discovers Ancient Gold Treasure in Crimea — Ukraine Considers It Looting
“ते आमचा वारसा लुटत आहेत,” युक्रेनचा आरोप; रशियाने क्रिमियामध्ये शोधला प्राचीन सोन्याचा खजिना !
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं
navneet rana and balwant wankhede
Navneet Rana : “मी राजीनामा देतो, पण…”, नवनीत राणांना खासदार बळवंत वानखेडेंचं प्रतिआव्हान!

“आज आम्ही जेव्हा विदेशात देशाचं नाव भारत सांगतो तेव्हा लोक डोळे फाडून आमच्याकडे बघतात. भारत, मोदीजी असं विचारतात. आम्हाला याचा केवढा मोठा अभिमान आहे. पाकिस्तानसारखं राष्ट्र आम्हाला नेहमी डोळे दाखवायचं. आज पाकिस्तान जगाच्या नकाशावर आहे की नाही? खायला महाग झाले आहेत”, असंही महाजन म्हणाले.

“पूर्वी विदेशात गेल्यावर भारतीयांना उधारीवाले म्हणायचे आणि…”, गिरीश महाजन याचं मोठं वक्तव्य

“गिरीश महाजनांनी स्पष्ट कबुलीच दिली”

दरम्यान, गिरीश महाजन यांच्या या वक्तव्यावर सचिन सावंत यांनी खोचक ट्वीट केलं आहे. “विदेशात जाऊन उधारी मागणारे लोक भाजपावाले होते, ही स्पष्ट कबुली गिरीश महाजनांनी दिली आहे! पाहा महाजनांचे डोळे कसे बारीक आहेत ते”, असं सचिन सावंत यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, या वक्तव्यावरून आता काँग्रेस आणि भाजपा यांच्यात कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.

Story img Loader