मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत शिवनेरी किल्ल्यावरील एक प्रसंग सर्वांना सांगितला. यावेळी त्यांनी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा साक्षात्कार झाल्याचं सांगत ती आठवण सांगितली. मात्र त्यांनी सांगितलेल्या या घटनेवरुन काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी टोला लगावला आहे. “राज ठाकरेंना महाराज कळले असते तर सतत भूमिका बदलल्या नसत्या आणि भोंगे शोधले नसते,” असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

राज ठाकरेंनी काय किस्सा सांगितला ?

“१९९४ सालची ही गोष्ट आहे. मी माझ्या कार्यालयात बसलो होतो. डायरीत शिवजयंतीचे कार्यक्रम लिहिले होते. ‘सामना’चे बाजीराव दांगट आणि त्यांचे भाऊ माझ्याकडे आले. बाळासाहेब फार वर्षांपूर्वी शिवनेरीला आले होते, त्यानंतर ठाकरे घराण्यातील कोणी आलेलं नाही, तर तुम्ही या असा आग्रह त्यांनी केला. मी त्यांना व्यग्र असल्याचं सांगत डायरी दाखवत होतो. माझे सगळे कार्यक्रम आखले असल्याने शक्य नाही असं मी त्यांनी सांगत होतो,” असं राज ठाकरेंनी सांगितलं.

Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : “उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर…”, चंद्रशेखर बावनकुळे यांचं खुलं आव्हान
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Rahul Narwekar
विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार का? अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केली भूमिका
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray : “आम्हाला ‘बटेंगे तो कटेंगे’ सांगणारे अशावेळी जातात कुठे?” बेळगावच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचा भाजपाला सवाल
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray : महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागाबाबत आदित्य ठाकरेंची मोठी मागणी; म्हणाले, “सर्व विवादित भाग…”
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “दाढी कुरवाळण्याच्या नादात जे काही पाप केले…” हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका
Uddhav Thackeray On Raj Thackeray :
Uddhav Thackeray : “पक्षाला एक हेतू लागतो, पण हे त्या पक्षात…”, उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका

“इतका घाणेरडा महाराष्ट्र आजपर्यंत मी पाहिलेला नाही,” राज ठाकरे संतापले; म्हणाले “आमच्या माणसांनी…”

“रात्री मी घरी आल्यानंतर काय झालं माहिती नाही. मी दुसऱ्या दिवशी सकाळी कार्यालयात आलो, सर्व कार्यक्रम रद्द केले आणि तिथे शिवनेरी असं लिहिलं. शिवजयंतीच्या आदल्या दिवशी मी जुन्नरला गेलो. सकाळी ४ वाजता आम्ही गड चढायला सुरुवात केली,” अशी माहिती राज ठाकरेंनी दिली.

राज ठाकरेंची मोठी घोषणा! छत्रपती शिवाजी महाराजांवर आणणार तीन भागांचा चित्रपट

“तेथील खोलीत गेल्यानंतर भिंतीवर कोणीतरी हळद आणि कुंकू टाकलं होतं, त्याकडे पाहत होतो. तितक्यात माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला आणि “इथेच शिवाजी महाराजांचा जन्म झाला” असं सांगितलं. मी मागे वळून पाहिलं असता कुणीच नव्हतं. मी काही वेळ एकाच जागी स्तब्ध झालो. यानंतर मी किल्ल्यावरुन खाली आलो. डोक्यावर पाण्याच्या बाटल्या ओतल्या आणि शांत बसून राहिलो. त्यानंतर मी गड उतरण्यास सुरुवात केली. त्या घटनेनंतर मी तीन ते चार वेळ शिवनेरीला गेलो, पण पुन्हा असं झालं नाही,” असा प्रसंग राज ठाकरेंनी सांगितला.

सचिन सावंत यांचा टोला –

राज ठाकरेंनी सांगितलेल्या या घटनेनंतर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्वीट करत टोला लगावला आहे. “राज ठाकरे यांच्यावर लगे रहो मुन्नाभाई किंवा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय चित्रपटाचा प्रभाव असण्याची शक्यता आहे. पाठीवर हात ठेवणं, चोक होणं, साक्षात्कार वैगेरे,” अशी टीका त्यांनी उपहासात्मकपणे केली आहे.

राज ठाकरेंनी मुलाखतीत आपण ‘गांधी’ चित्रपट ३० ते ३५ वेळा पाहिल्याचं सांगितलं होतं. त्यावरुनही त्यांनी टोला लगावत, एखादा चित्रपट ३०-३२ वेळा पाहण्याची सवय आहेच असं म्हटलं.

“छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राला समजण्याची इच्छा ‌व्यक्त करण्याआधी राज ठाकरे यांना महाराज कळले असते तर सतत भूमिका बदलल्या नसत्या आणि भोंगे शोधले नसते. खरोखरच महाराज त्यांना कळावे ही सदिच्छा,” असंही सचिन सावंत म्हणाले आहेत.

Story img Loader