संजय मोहिते
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
बुलढाणा : शेगावच्या सभेसाठी काँग्रेसने जणू ‘दिवसाची रात्र’ करणे सुरू केले आहे. १९ एकर शेत, अडीच लाखांवर प्रेक्षक क्षमता, १८ सेक्टर अन् ११ प्रवेशद्वार, अशी जय्यत तयारी जोरात सुरू आहे. कन्याकुमारी ते काश्मीर अशा भारत जोडो पदयात्रेवर निघालेले काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांची महाराष्ट्रातील दुसरी सभा बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे शुक्रवारी होणार आहे. ही सभा जंगी व्हावी यासाठी प्रदेश काँग्रेस, राज्यातील प्रमुख नेते ते जिल्हा काँग्रेस असे सर्वच नियोजनात व्यस्त आहेत.
ही सभा काँग्रेसने गंभीरतेने घेतली आहे. पक्षातील मरगळ दूर सारून नवचैतन्य निर्माण करता यावे यासाठी अनेक दिग्गजांनी आपली राजकीय झूल दूर सारून व विशेष म्हणजे, पक्षांतर्गत गटातटाचे राजकारण काही काळासाठी लांब ठेवून शेगावात मुक्काम ठोकला आहे. आनंद सागर जवळील १९ एकर शेतजमिनीवर होणाऱ्या या सभेचे नियोजन देखील अभूतपूर्व म्हणावे असेच आहे. या मैदानाची प्रेक्षक क्षमता अडीच लाखांवर आहे. मागील मोकळय़ा जागेत उभे राहून का होईना लाखाच्या आसपास प्रेक्षक सभा ऐकू शकतात. या सभेत तीन व्यासपीठ राहणार असून श्रोत्यांसाठी १८ सेक्टर आणि ११ प्रवेशद्वार असतील. या सभेची जय्यत तयारी आता अंतिम टप्प्यात असून या तयारीवर काँग्रेस नेते बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
रिंगण सोहळय़ात ‘पावली’ खेळणार!
शुक्रवारी सकाळी राहुल गांधी हे बाळापूर (अकोला जिल्हा) येथून शेगाव येथे दाखल होतील. तिथे जंगी स्वागताचे नियोजन करण्यात आले आहे. यानंतर वरखेड येथे उभारण्यात आलेल्या पहिल्या शिबिरात दाखल होणार आहेत. याठिकाणी उभारण्यात आलेल्या विठ्ठलाच्या महाकाय मूर्तीसमोर रिंगण सोहळा पार पडणार आहे. पावली खेळणाऱ्या कमी-अधिक एक हजार वारकऱ्यांसोबत ते काही काळ रमणार आहेत. यावेळी गांधी यांचा वारकऱ्यांचा वेश, टोपी व वीणा देऊन खास वारकरी पद्धतीने सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती ज्ञानेश्वर पाटील यांनी दिली. यानंतर संत गजानन महाराजांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतल्यावर संध्याकाळी चारला जाहीर सभा प्रारंभ होणार आहे. मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील भारत जोडो पदयात्रा व सभेची जंगी तयारी करण्यात येत असल्याची माहिती आ. यशोमती ठाकूर व जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी दिली.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांनी शेगाव येथे भेटी देऊन नियोजनासंदर्भात बैठका घेतल्या. तसेच पदयात्रेचा मार्ग व सभास्थळाची पाहणी केली. मागील आठवडय़ापासून मी व राहुल बोंद्रे शेगावात तळ ठोकून असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. याशिवाय स्थानिक नेते ज्ञानेश्वर पाटील, रामविजय बुरुंगले, शेलेंद्र पाटील, किरण देशमुख, तेजेंद्रसिंह हे शेगावातील कार्यक्रमाची विविध जबाबदारी सांभाळत आहेत.