राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात राज्यातील विविध प्रश्नांवरून विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधकांच्या प्रश्नांवर सत्ताधारीही जशास तसं उत्तर देताना दिसत आहेत. कधी-कधी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सभागृहात चांगलीच खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळतं. आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खोचक टीका केली. “अजित पवारांचा धाक कमी झाला आहे. आता सूचना दिल्या तरी अमलबंजावणी होत नाही”, असा खोचक टोला नाना पटोले यांनी लगावला.

नाना पटोले काय म्हणाले?

“पुरवणी मागण्या आता आहेत. ९४ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या पुन्हा येणार आहेत, असा अंदाज आहे. सभागृहात एका पेक्षा एक अर्थमंत्री बसलेले आहेत. आता सरकार जे संकेत दाखवत आहे, याचा अर्थ असा आहे की दाल में कुछ काला है, म्हणजे सरकारचं दिवाळं निघालं आहे. मी २०२४ -२०२५ या अर्थसंकल्पातील नियोजन विधेयकासंदर्भात सभागृहात भूमिका मांडत आहे. आम्ही सातत्याने नियोजनाबाबत प्रश्न उपस्थित करत असतो”, असं पटोले म्हणाले.

Navi Mumbai Semiconductor Project, Eknath Shinde,
राज्यात आमचेच सरकार असणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Atishi Marlena Woman Chief Ministers List
Atishi : दिल्लीचा कारभार आतिशी यांच्या हाती; ‘या’ १६ महिला मुख्यमंत्र्यांनी केलंय विविध राज्यांचं नेतृत्व
Arvind Kejriwal resign today
केजरीवाल यांचा आज राजीनामा? राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ मागितली
government schemes Eknath shinde marathi news
सर्वसामान्यांच्या योजना कायम राहणार – मुख्यमंत्री
After Ajit Pawars visit NCP state general secretary resigned in Nagpur
अजित पवारांच्या दौऱ्यानंतर नागपुरात पक्षात पडझड, प्रदेश सरचिटणीसाचा राजीनामा
Mamata Banerjee is aggressive in the Assembly on the safety of women
विधेयकाच्या आडून भाजप लक्ष्य, विधानसभेत ममता बॅनर्जी आक्रमक; प. बंगालमध्ये ‘अपराजिता’ कायदा
Himanta Biswa Sarma
CM Himanta Sarma : “आसामला धमकवण्याची तुमची हिंमत कशी झाली?” ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ विधानवरून मुख्यमंत्री सरमा यांचा हल्लाबोल!

हेही वाचा : “चेंबरमध्ये बसून लोकांचं दुःख कळतं का?”, भास्कर जाधव सभागृहात का संतापले?

“अर्थमंत्री अजित पवार यांच्याबरोबर दोन दिवसांपूर्वी आमची एक बैठक झाली. त्यांनी नियोजन विभागाला सूचनाही दिल्या. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नाही. ही गंभीर बाब सभागृहाच्या मांध्यमातून सरकारला मी सांगू इच्छितो. राज्य सरकारने ज्या सूचना दिल्या, त्याची खाली कुठेही अंमलबजावणी होत नाही. राज्यातील विविध मतदारसंघात योजनांची अंमलबजावणी करावी लागते. त्यासाठी या आयोगाच्या माध्यमातून केली जाते. मात्र, विरोधकांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या मतदारसंघात कामचं होऊ नयेत. अशा प्रकारे हे सरकार काम करतंय का? असा प्रश्न पडतो. दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी सूचना दिल्या होत्या. त्या सूचनांची अंमलबजावणी खाली कुठेही झालेली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा धाक आम्हाला सर्वांना माहिती आहे. मात्र, आता अजित पवार यांचा धाक का कमी झाला? हे कळायला मार्ग नाही”, असा टोला नाना पटोले यांनी अजित पवार यांना लगावला.