देशात लोकसभा निवडणूक पार पडली असून ४ जून रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मात्र, निकालाच्या आधी १ जून रोजी एक्झिट पोल समोर आले आहेत. या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, पुन्हा एकदा एनडीएचं सरकार सत्तेत येईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. एनडीएने ३५० चा आकडा पार करेल असं एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलं आहे. एक्झिट पोलनंतर राजकीय नेते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकीकडे भाजपा पुन्हा सत्ता स्थापनेचा दावा करत आहे, तर दुसरीकडे इंडिया आघाडी सत्ता स्थापन करेल, असा दावा विरोधी पक्षातील नेते करत आहेत. यावर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत विविध घडामोडींवर भाष्य केलं.

सांगली लोकसभेच्या जागेसंदर्भात एक्झिट पोलमध्ये विशाल पाटील हे जिंकतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली. यावर बोलताना संजय राऊतांनी यावर नंतर बोलणार आहे. आम्हाला प्रत्येक गोष्ट माहिती आहेत. आम्ही काय गोट्या खेळत नाही. आमचं आयुष्य सुद्धा राजकारण, समाजकारणात गेलं आहे, असा अप्रत्यक्ष इशारा राऊतांनी काँग्रेसला दिला. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊतांवर खोचक टीका केली. “संजय राऊत ज्या शाळेत शिकले ती शाळा काँग्रेसने निर्माण केली”, असा टोला पटोले यांनी लगावला.

raj thackeray latest news
काँग्रेसबरोबर युती करण्यावरून राज ठाकरेंची पुन्हा उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले, “मी, माझा स्वार्थ, माझी खुर्ची अन्…”
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
Amit Shah on Uddhav Thackeray
Amit Shah : “उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर…”, अमित शाहांचं भर सभेत खुलं आव्हान, म्हणाले…
Raj Thackeray Slams Uddhav Thackeray in his Speech
Raj Thackeray : राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका, “बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते माझ्या शिवसेनेची काँग्रेस होताना दिसली तर..”
Pramod Mahajan Death Poonam Mahajan
‘प्रमोद महाजनांच्या हत्येमागे गुप्त हेतू’; पूनम महाजन म्हणाल्या, “आता अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांना…”
devendra fadnavis criticisze uddhav thackeray by taking name of balasaheb thackeray
“अल्पसंख्याकांच्या मतांसाठी ठाकरेंनी बाळासाहेबांना … ” काय म्हणाले फडणवीस
Devendra Fadnavis Answer to Uddhav Thackeray
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान “छत्रपती शिवरायांचं पहिलं मंदिर मुंब्र्यात उभारुन दाखवा, आम्ही..”

हेही वाचा : आमदार रवी राणांचा उद्धव ठाकरेंबाबत मोठा दावा; म्हणाले, “मोदी पुन्हा सत्तेत आल्यावर १५ दिवसांत…”

नाना पटोले काय म्हणाले?

“कोणीही गोट्या खेळायला येथे बसलेलं नाही. सगळेजण राजकारण करायला आलेले आहेत. तुम्ही शंभर टक्के राजकारण करत असताल, पण आम्ही ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करत आहोत. त्यामुळे संजय राऊत यांच्याबाबत मी जास्त वक्तव्य करणार नाही”, असं पटोले यांनी म्हटलं.

संजय राऊतांना टोला

आजच्या रोखठोकमध्ये राऊत यांनी असं म्हटलं की, ७० वर्षात लोकशाहीचा कचरा केला, त्यांच्या या विधानावर तुमची प्रतिक्रिया काय? यावर नाना पटोल म्हणाले, “संजय राऊत ज्या शाळेत शिकले ती शाळा काँग्रेसने निर्माण केली होती. त्यांच्या गावात पिण्याचे पाणी, रुग्णालय काँग्रेसने निर्माण केलं होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान टिकवण्याचं काम काँग्रेसने केलं आहे. मी संजय राऊत याच्याबाबत काय प्रतिक्रिया द्यावी? ते अतिविद्वान आहेत. कालच ते लंडनवरून आले आहेत. तिकडून अजून काय जास्त शिकून आले ते मला माहिती नाही. त्यांच्यावर तिकडच्या थंडीचा असर झाला आहे की देशातील उष्णतेचा असर झाला हे मला माहिती नाही”, अशा खोचक शब्दांत नाना पटोले यांनी संजय राऊतांच्या विधानाला प्रत्युत्तर दिलं.