करोना लॉकडाउनमध्ये काँग्रेसच्या लोकांनी मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर उभे राहून मुंबईतील कामगारांना आपआपल्या घरी जाण्यासाठी तिकीट काढून दिले. लोकांना मुंबई सोडून जाण्यासाठी प्रोत्साहित केलं. त्यामुळे तिथे करोना वाढला असल्याचा आरोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. तर, मोदींच्या या गंभीर आरोपानंतर आता राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. विरोधी पक्ष काँग्रेसकडून पंतप्रधानांच्या या टीकेला उत्तर दिलं जात आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.

अर्थसंकल्पीय संसद अधिवेशन सुरू असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणावर सत्ताधारी आणि विरोधकांमधील विविध खासदारांची भाषणे पूर्ण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (७ फेब्रुवारी) लोकसभेत या चर्चेला उत्तर दिलं. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आणि सरकारच्या धोरणांबाबत भूमिका स्पष्ट केली.

Devendra Fadnavis, Mahesh Landge,
“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : “बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या घोषणांमध्ये चुकीचं काहीच नाही, या घोषणा..”; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
accountability of devendra fadnavis declined due to his divisive politics says supriya sule
फोडाफोडीच्या राजकारणामुळे फडणवीसांची विश्वसनीयता कमी; सुप्रिया सुळे
savner assembly constituency election 2024 amol deshmukh ashish deshmukh, BJP, COngress, Rebel
सख्खा भाऊ झाला पक्का वैरी… अमोल देशमुख म्हणाले, आशीष देशमुखांची मानसिकताच….
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देतान नाना पटोले म्हणाले, “पंतप्रधान मोदी असंवेदनशीलतची हद्द पार करत आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. करोना जेव्हा सुरू झाला, जागतिक आरोग्य संघटनेने जी मार्गदर्शक तत्वे सूचवली, त्याचं पालन केलं असतं तर ही वेळ देशावर आली नसती. ही चूक अगोदर त्यांनी मान्य करावी. नमस्ते ट्रम्प कोणी केलं? तब्लिगी समजाला जागतिक पातळीवरचं अधिवेशन या देशात कोणी घ्यायला लावलं? या दोन गोष्टींचं उत्तर जनतेला त्यांनी द्यावं.”

PM Modi in Lok Sabha : काँग्रेस ‘टुकडे टुकडे गँग’ची लीडर बनलीय : मोदी

तसेच, “किती वर्ष तुम्ही काँग्रेसला शिव्या देऊन सत्तेचा उपभोग घेऊन, देश विकणार आहात? याचंही उत्तर दिलं पाहिजे. तुम्ही ज्या दिवशी लॉकडाउन सुरू केला, त्या दिवशी रेल्वे बंद करून टाकली. बस, विमानसेवा बंद केली. त्यावेळी लोकाना भारत-पाकिस्तानचं विभाजन झालं आणि जो काही त्रास त्यावेळी भोगावा लागला, तीच परिस्थिती तुम्ही लॉकडाउन जाहीर केल्यानंतर झाली. रेल्वेखाली येऊन लोकांचा मृत्यू झाला. रस्त्यांवर लोकाचा मृत्यू झाला. गरदोर महिलांची काय अवस्था झाली ते आपण पाहिलं का?” असंही नाना पटोले यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हणाले.

याचबरोबर, “असंवेदनशील अशा व्यवस्थेला झाकण्यासाठी काँग्रेसवर आरोप करत आहेत. उलट त्यांनी काँग्रेसने तर माणुसकीचं नातं जोडलं हे सांगायला पाहिजे. आम्ही त्यावेळच्या सर्व लोकाना तपासून रेल्वेत बसवून, त्यांच्याजवळ पैसे नव्हते रोजीरोटी कमावण्यासाठी इथे लोक आली होती त्यांना तिकीट आम्ही काढून दिली. त्यांनी तर उलट शाबासकी द्यायला हवी होती, पण ठीक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान कमी आणि भाजपाचे प्रचारक म्हणून सातत्याने वागत आहेत, याचा प्रत्यय आज त्यांनी दिला. ते पंतप्रधान नाहीत तर भाजपाचे प्रचारक म्हणून बोलतात, जनतेची कुठली काळजी नसलेला हा पंतप्रधान देशाने आज पाहीला आहे.” असंही नाना पटोले यांनी यावेळी बोलून दाखवलं.