विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या मोहन जोशींनी आपला अर्ज मागे घेतला आहे. विधान परिषदेची एका जागेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत धुसफूस सुरू होती. जोशी यांनी आपला अर्ज मागे घेतल्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. विनायक राऊत हे लोकसभा निवडणूक खासदार म्हणून निवडून आल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. मात्र या जागेवर शिवसेनेने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला होता. म्हणून एकही उमेदवार या निवडणुकीत उतरवला नाही.

Story img Loader