लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सांगली: राष्ट्रवादी काँग्रेसने बेकायदा कब्जा केलेले कार्यालय सोडले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जायचे की नाही याचा विचार करावा लागेल. आमच्या मागणीला प्रतिसाद दिला नाही तर आम्हाला कार्यालयात घुसावे लागेल आणि होणाऱ्या परिणामास सर्वस्वी आ. जयंत पाटील जबाबदार असतील असा इशारा काँग्रेसचे वाळवा तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी अल्पसंख्यांकचे शाकीर तांबोळी, विजय पवार उपस्थित होते.

यावेळी श्री पाटील म्हणाले, गेल्या काही दिवसापासून आम्ही काँग्रेसचे कार्यालय ताब्यात मिळावे यासाठी बैठका व ठिय्या आंदोलन केले. राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांशी चर्चा केली मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही. खा. शरद पवार यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचे ठरले होते. आम्हाला दि. ६ जुलैची तारीख दिली होती. त्याअधीच राष्ट्रवादीमध्ये कलह निर्माण झाल्यामुळे आंदोलन स्थगित करावे लागले.

हेही वाचा… “…यामुळे भाजपाच गोत्यात जाणार”; बच्चू कडूंचं थेट विधान, खदखद व्यक्त करत म्हणाले…

पाटील म्हणाले, पवारसाहेबांनी कालच्या भाषणात काँग्रेस सोडली तेंव्हा आम्ही काँग्रेसचे कार्यालय सोडले होते असे जाहीर विधान केले होते. मात्र इस्लामपुरातील काँग्रेसचे कार्यालय हे राष्ट्रवादी सोडण्यास तयार नाही. त्यामुळे आम्हाला वरिष्ठांना सांगून राष्ट्रवादीबरोबर रहायचे की नाही याचा निर्णय घ्यावा लागेल.

हेही वाचा… “८२ काय ९२ वर्षांचा झालो तरीही…”, शरद पवार यांचं अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर

शाकीर तांबोळी म्हणाले, काँग्रेसच्या ठिय्या आंदोलनाची धास्ती राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी घेतली होती. आंदोलन दिवशी ते या कार्यालयात बसून होते. त्यांनी आमच्या मागणीला प्रतिसाद दिला नाही तर आम्हाला कार्यालयात घुसावे लागेल आणि होणाऱ्या परिणामास सर्वस्वी आ. जयंत पाटील जबाबदार असणार आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress walwa taluka president jitendra patil warned that ncp should vacate the occupied office or will break in dvr