निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव तसेच धनुष्यबाण निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थकांमधील वाद आणखी तीव्र झाला आहे. उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे पर्यायी निवडणकू चिन्हे तसेच पक्षाची नावे सादर केली आहेत. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची भूमिका काय असेल? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. दरम्यान, महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. अशा कठीण काळात आम्ही उद्धव ठाकरेंसोबत आहोत, असे नाना पटोले म्हणाले आहेत.

हेही वाचा >>> आता ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ नावावरुन शिंदे आणि ठाकरेंमध्ये वादाची शक्यता; मात्र हे नाव ठाकरेंना मिळण्याची शक्यता अधिक कारण…

बाळासाहेबांनी निर्माण केलेला पक्ष तसेच निवडणूक चिन्ह संपल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुखांना, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना त्रास होणे स्वाभाविक आहे. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये आमचा हात निश्चितच त्यांच्यासोबत राहील. मित्र अडचणीत आला तर त्याला मदत करणे हाच आमचा धर्म आहे, असे नाना पटोले यांनी स्पष्टपणे सांगितले. मात्र स्थानिक स्वराज संस्था आम्ही स्वबळावर लढवू असेही नाना पटोले म्हणाले.

हेही वाचा >>> “धनुष्यबाण गोठवलं अन् उद्धव ठाकरेंना अश्रू…”, भास्कर जाधवांच्या भाषणामुळे शिवसैनिकही हळहळले

नाना पटोले यांनी भाजपालाही लक्ष्य केले. देशाच्या लोकशाहीत सत्य कधीही पराजित होऊ शकत नाही. भाजपाने असत्याच्या मार्गाने सत्ता घेतली. भाजपा इतर राजकीय पक्षांना संपवण्याचे तसेच देशाचा नाश करण्याचे काम करत आहे. हे जास्त काळ चालू शकणार नाही, असेही पटोले म्हणाले.

Story img Loader