लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सोलापूर : एका तरूणीबरोबर प्रेमसंबंध प्रस्थापित केल्याच्या रागातून एका तरूणाचा शांत डोक्याने कट रचून बेदम मारहाण करून त्यास विहिरीत ढकलून देऊन खून केल्याचा गुन्हा तीन वर्षांनी उघडकीस आला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील नंदूर येथे घडलेल्या या गुन्ह्याप्रकरणी दोन महिलांसह सहाजणांविरूध्द सोलापूर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
प्रवीण नागनाथ भरले (वय २१, रा. सोरेगाव, सोलापूर) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. त्याचे वडील नागनाथ कृष्णा भरले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्राजक्ता प्रमोद गायकवाड (वय २९), अर्चना प्रमोद गायकवाड (वय ३१), श्रीधर प्रमोद गायकवाड (वय ३२, रा. सैफुल, राघवेंद्रनगर, विजापूर रोड, सोलापूर), विकास जानराव (वय ३२), प्रकाश विश्वनाथ फुलमाळी (वय ३५) आणि अनिल शिवराय (वय ३४, रा. नंदूर, ता. उत्तर सोलापूर) अशी आरोपींची नावे निष्पन्न झाली असून यापैकी कोणालाही अटक झाली नाही.
आणखी वाचा-टीम इंडियाचा सरकारी सत्कार, विधानपरिषदेत विरोधक आणि सत्ताधारी ‘त्या’ पोस्टरवरुन भिडले
२ जुलै २०२१ रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास नंदूर येथे रखमाजी जाधव यांच्या शेतात प्रवीण भरले यास बेदम मारहाण करून त्यास बेशुध्दावस्थेत विहिरीत ढकलण्यात आले होते. सोलापूर तालुका पोलिसांनी सुरूवातीला अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करून तपास सुरू केला. न्यायवैद्यक तपासणीचा अहवाल व अन्य पुरावे समोर आले. मृत प्रवीण याचे एका तरूणीबरोबर प्रेमसंबंध होते. परंतु गायकवाड कुटुंबीयांना त्याचा राग होता. याच कारणावरून हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.