राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज निकाल जाहीर करणार आहेत. या विषयावर ज्येष्ठ घटनातज्ञ उल्हास बापट यांनी भाष्य केले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष नाव आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिल्याने आमदार अपात्रता प्रकरणी या निर्णयाच्या आधारे सर्व याचिका फेटाळल्या जाण्याची चिन्हे आहेत. याआधी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात दोन्ही बाजूपैकी एकाही आमदाराला अपात्र ठरविण्यात आले नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत कोणता निर्णय घेतला जातो? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेसचेही सर्व आमदार पात्र ठरणार?

टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी संवाद साधत असताना उल्हास बापट म्हणाले की, आपली संसदीय लोकशाही ब्रिटनवरून घेण्यात आली आहे. तिथे सभागृहाचा अध्यक्ष पंचप्रमाणे काम करतो. तिथे सभागृहाचा अध्यक्ष निवडला गेल्यानंतर तो पक्षाचा राजीनामा देऊन पुढे काम पाहतो. आपल्याकडचा अध्यक्ष कुठल्यातरी पक्षाचा सदस्य असतो, त्यामुळे त्याच्याकडून फार न्यायाची अपेक्षा करणे चुकीचे आहे. त्यात जर चार-पाच पक्ष बदललेला अध्यक्ष असेल तर त्याकडून न्यायाची अपेक्षा ठेवणे आणखी चुकीचे आहे.

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र ठरले, तर…”, उल्हास बापटांचं विधान

“पक्ष कोणाचा आहे, हे ठरविण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, हे आता आपल्या सर्वांनाच कळले आहे. पण निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची नेमणूक पंतप्रधान करतात. ६५ वर्षांनंतर त्यांना योग्य कामाची बक्षिसी देण्याचे कामही पंतप्रधान करतात, त्यामुळे मी त्यांच्याकडून फार न्यायाची अपेक्षा करत नाही. राहता राहिला प्रश्न राज्यपालांचा, तर त्यांचीही निवड पंतप्रधानांच्या सूचनेवर राष्ट्रपती करत असतात. ज्या पदावरील लोकांनी तटस्थपणे पंचाची भूमिका पार पाडणे आवश्यक आहे, त्यांची विश्वासाहर्ता घसरताना गेल्या काही काळापासून आपल्याला दिसत आहे”, असे महत्त्वाचे विधान घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी केले.

ताजी अपडेट

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा हे ठरवताना विधिमंडळ बहुमाताचा विचार करावा लागेल. अजित पवार गटाकडे ५३ पैकी ४१ आमदार आहेत. या बहुमताला शरद पवार गटाने आव्हान दिलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांचाच आहे”, असा महत्त्वाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज (१५ फेब्रुवारी) रोजी दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Constitutionalist ulhas bapat reaction on ncp mla disqulification decision by assembly speaker rahul narvekar kvg
Show comments