बांधकाम क्षेत्रात होणारे आमुलाग्र बदल आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या समावेश या विषयावर मंथन घडवून आणण्यासाठी येथील असोसिएशन ऑफ रियल इस्टेट कन्सल्टंटतर्फे (आर्क) १० फेब्रुवारी रोजी उत्तर महाराष्ट्र स्तरावरील पहिल्याच संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन सकाळी साडे आठला पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते होणार आहे. या बाबतची माहिती आर्कचे अध्यक्ष डी. जे. धामणे व माजी अध्यक्ष दीपक काळवीट यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. मुंबई-आग्रा महामार्गावरील पाथर्डी फाटा येथील एक्स्प्रेस इन हॉटेलमध्ये हे संमेलन होणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नॅशनल असोसिएशन ऑफ रियलटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन श्रॉफ, उपाध्यक्ष रवी वर्मा, संस्थापक सदस्य नरेश मलकानी, क्रेडाईचे राज्याध्यक्ष अनंत राजेगावकर, नाशिक चॅप्टरचे अध्यक्ष किरण चव्हाण आदी उपस्थित राहणार आहेत. संमेलनात बांधकाम क्षेत्रात होत असलेले बदल, सोशल मीडिया व डिजिटल मार्केटींग यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने व्यवसायात करता येणारी वाढ, विपणन तंत्र आदी विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा