पुणे- मुंबई द्रुतगतीमार्गावर खोपोली एक्झिट जवळ कंटेनर पलटी झाल्याने पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला असून काही वेळासाठी वाहतूक ठप्प होती. अपघातात चालक किरकोळ जखमी झाला आहे. पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अपघात झाल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे.
पुणे- मुंबई द्रुतगतीमार्गावर साडेपाचच्या सुमारास कंटेनर पलटी झाल्याने पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरवरील चालकाचे नियंत्रण सुटून दुभाजक ओलांडून पुण्याच्या लेनवर पलटी झाला. यामुळे मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळ ठप्प होती. कंटेनर बाजूला घेण्यात आला आहे. सध्या वाहतूक सुरळीत असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे.