सातारा: जिल्ह्याच्या पश्चिम भागात विशेषत: महाबळेश्वर, पाचगणी, कास पठार, शिवसागरजलाशय, तापोळा, कांदाटी खोऱ्यात आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. मागील काही दिवसांपासून झालेल्या पावसाने निसर्गसौंदर्य बहरू लागले आहे. पावसाळी पर्यटनासाठी पर्यटक गर्दी करू लागले आहेत.धुक्याची धुलाई, हिरवेगार डोंगर आणि फेसाळणारे धबधबे यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी आहे.
महाबळेश्वरमध्ये व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दिवसभरात १००.६० मि. मी(९७१.२०मिमी), कोयना १०२मिमी (एकूण ९४५ मिमी ) तर साताऱ्यात ३.२ मि. मी. पावसाची नोंद झाली. धोम १८मिमी २२८ मिमी६१मिमी (४७२) कण्हेर ४४मिमी(१९६) उरमोडी ५६मिमी(२३१) तारळी ५६मिमी(२७८) पावसाची नोंद झाली.
हेही वाचा : सातारा: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे दाखले मिळवण्यासाठी महिलांची तुडुंब गर्दी
महाबळेश्वर-तापोळा मुख्य रस्त्यावर महाबळेश्वरपासून नऊ कि.मी. अंतरावर चिखली शेड परिसरात सोमवारी पहाटे दरड कोसळली. डोंगरावरून राडारोडा आणि मोठे दगड खाली आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, पावसामुळे पश्चिमेला भात लावणीच्या कामांना वेग आला आहे.मुख्य रस्त्यावरच माती दगड आल्याने तापोळा भागामध्ये जाण्यासाठी एका बाजूने वाहतूक सुरु होती सार्वजनिक बांधकाम विभागाने सकाळी जेसीबी च्या साहाय्याने माती दगड हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे काम सुरू होते. पहाटे दरड कोसळल्याने वाहतूक मंदावली होती.
केळवली (ता सातारा) धबधबा परिसरात प्रचंड मुसळधार पाऊस सुरु आहे. रविवारी या धबधब्यात मित्रांसोबत गेलेला युवक बुडाला आहे. या पावसात सुध्दा शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमचं काम सुरू आहे. साताऱ्यातील भुयारी मार्गात (ग्रेड सेपरेटर) पावसामुळे घसरटे झाल्याने दुचाकींची घसराघसरी होत असल्याने दुचाकींना ग्रेट सेपरेटर मध्ये जाण्यापासून पोलिसांनी केला मज्जाव केला आहे. संततधार पावसाने सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलावाची पाणी पातळी ५० फुटापर्यंत गेली आहे महाबळेश्वर येथील लिंगमळा धबधबा ओसंडून वाहत आहे शनिवारपासून ठोसेघर धबधबा ही सुरू झाला असून त्या ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढली आहे. बबन पांडुरंग कदम (वय ६२,रा घावरीं,ता महाबळेश्वर)हे मोठ्या पावसात ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेले आहेत.त्यांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.साताऱ्यात अतिवृष्टी होण्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून एन डी आर एफ चे पथक जिल्हयात दाखल झाले आहे.
साताऱ्यात२७ मोठे व २२ मध्यम आकाराचे धबधबै आहेत. या ठिकाणी सुरक्षेसाठी पोलीस, वन विभाग, महसूल विभाग यांचे कर्मचारी तैनात असतात. धोकादायक ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांना रोखले जाते. तसेच पर्यटकांनी दुर्घटनाग्रस्त ठिकाणी पर्यटन करणे टाळावे. दोन दिवसांपूर्वी दोन सातारा येथे धबधब्याच्या ठिकाणी एका पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाला ही बाब लक्षात घेता पर्यटकांनी पावसाळी पर्यटनाचा आनंद घेत असताना काळजी घ्यावीअसे आवाहन जिल्हाधिकारी डुडी यांनी केले आहे.