Maharashtra Rain updates : कराड : पश्चिम घाटमाथ्यांसह कोयना पाणलोटक्षेत्रात सलग नऊ दिवसांच्या मुसळधार पावसाने कृष्णा, कोयना व पंचगंगा नद्यांकाठी दैना उडवली. अशातच खबरदारी म्हणून कोयना धरणाचे दरवाजे दीड फुट उघडल्याने सांगली, कोल्हापूर महापुराच्या उंबरठ्यावर असून, कोयनाकाठही धास्तावला आहे. सततच्या जोरधारेने नद्या पात्राबाहेरून वाहताना घरे- स्थावर मिळकतींची पडझड, रस्ते खचणे, बंधारेही वाहून जाण्यासह शेतजमीन, पूल, रस्ते पाण्याखाली गेल्याच्या विदारक चित्राने समाजमन सुन्न झाले आहे.

कोयनेची जलआवक ५५ टक्क्यांनी झेपावली

कोयना पाणलोटात गेल्या २४ तासात ३१३ मिलीमीटर (१२.३० इंच) आणि एकूण ३,३१६ मिलीमीटर (१३०.५५ इंच) पाऊस होताना, पाण्याची आवक ५५ टक्क्यांनी झेपावली आहे. धोम पाणलोटात ८० मिलीमीटर, कास ७९, वारणा ५२, तारळी ४६, दुधगंगा ४१, नागेवाडी ३१, कुंभी ३० मिलीमीटर असा जलाशयक्षेत्रातील पाऊस आहे. तर अन्यत्र, तांदुळवाडी येथे सर्वाधिक १७३ मिलीमीटर. खालोखाल जोर येथे १७०, सावर्डे ८३, धनगरवाडा ७८, कटी ७७, मांडुकली ७२ मिलीमीटर असा तुफान पाऊस झाला आहे.

possibility of cloudy weather in maharashtra due to low pressure area formed in bay of bengal
रविवारपासून पुन्हा ढगाळ वातावरण; जाणून घ्या, थंडीची लाट, कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
water pipe bursts in Dombivli
डोंबिवलीत काँक्रीट रस्ते काम करताना जलवाहिनी फुटली;  पी. पी. चेंबर्सजवळ शेकडो लीटर पाणी वाया
Two months ago Thane Municipal Corporation requested bmc for 50 million liters of water
ठाण्याला वाढीव पाण्याची प्रतिक्षा, मुंबई महापालिकेकडून वाढीव पाण्याबाबत अद्याप निर्णय नाही
Water supply cut off in Malad Mumbai news
मालाडमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद; पाणी जपून वापरण्याचे महापालिकेचे आवाहन
problem of potholes on Khopta bridge to Koproli road will cleared soon
खोपटे पूल ते कोप्रोली मार्ग लवकरच खड्डेमुक्त, एक किलोमीटर रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी सात कोटींच्या निधीस मंजुरी
minimum temperatures in north Maharashtra
Maharashtra Weather Update : थंडीत आणखी वाढ होणार ? जाणून घ्या, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रासाठीचा अंदाज
water supply Bandra area, Bandra,
मुख्य जलवाहिनीतून गळती, वांद्रे परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम

हेही वाचा : विरोधकांच्या पोपटपंछीला फसू नका, उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे महिलांना आवाहन

कोयनेतून विसर्ग, संततधार अन् रेडअलर्टमुळे महापुराची धास्ती

पश्चिम घाटमाथ्यांसह कोयना पाणलोटक्षेत्रात सलग सुरु असलेली कोसळधार आणि हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असतानाच कोयना जलाशयाचे सहा वक्री दरवाजे सायंकाळी पाच वाजता दीड फुटानी उघडून १० हजार क्युसेक पाण्याचा जलविसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात आला आहे. कोयनेच्या पायथा विजगृहातुनही १,०५० क्युसेकचा जलविसर्ग सुरूच आहे. तर, कण्हेर धरणातून दुपारी १२ वाजता पाच हजार क्युसेकचा जलविसर्ग सुरु झाल्याने कृष्णा-कोयना, पंचगंगा नद्यांच्या जलपातळीत लक्षणीय वाढ होवून या नद्यांना महापूर येण्याची भीती आहे.

कोयनेचा जलसाठा ७८.२९ टीएमसी

शिवसागर जलाशयात गेल्या २४ तासात पाण्याची आवक तब्बल ५५ टक्क्यांनी वाढून ८५,९३७ क्युसेक झाली. पाणीसाठाही वेगाने वाढून ७८.२९ अब्ज घनफुट (टीएमसी) (७४.३८ टक्के) झाला आहे. या वेळी धरण परिचालन सूचीनुसार धरणाचा किती तारखेला किती पाणीसाठा असावा हे निश्चित असल्याने त्यानुसार धरणातून आज गुरुवारी सायंकाळी पाच वाजता कोयना शिवसागराचे सर्व सहाही दरवाजे दीड फुटाने उघडून १० हजार क्युसेकने जलविसर्ग करण्यात आला आहे.

हेही वाचा : Solapur Rain News: उजनी धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढतोय, धरण उपयुक्त पातळीत जाण्याची अपेक्षा

कोयनेतून जलविसर्ग वाढणार

सायंकाळी सात वाजलेपासून हा जलविसर्ग २० हजार क्युसेक करण्यात येणार आहे. तरी कृष्णा, कोयना व पंचगंगा या नद्यांकाठी दक्षतेच्या सुचना जारी झाल्या आहेत. शासकीय यंत्रणा खबरदारीच्या उपाययोजनांसाठी कामाला लागली आहे. याबाबत सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी लोकांनी आवश्यक ती दक्षता घेण्याचे आवाहन करताना, धबधबे तसेच नद्यांकाठी जाण्यास तात्पुरती बंदी केल्याचे सांगितले. दरम्यान, सातारा जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने उद्या मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर झाली आहे.

हेही वाचा : Sangli Rain News: महापूर सांगलीच्या वेशीवर, ४० कुटुंबांचे स्थलांतर, अलमट्टीचा विसर्ग ३ लाखावर

खरीप पेरा उत्कृष्ट पण, अन्य नुकसानही

दरम्यान, सलग जोरधारेने पडझडीचे सत्र सुरुच आहे. घरे, दरडी कोसळण्यासह रस्ते खचणे, बंधारे वाहून जाणे, सखल भागात पाणी साचण्यामुळे मोठे नुकसान होत आहे. तर, दुसरीकडे उपयुक्त पावसाने खरीपाचा पेरा उत्कृष्ठ ठरतो आहे. नद्यांच्या पाणीपातळीत पूरसदृश्य वाढ होताना, जलसाठे झपाट्याने वाढून अतिशय मजबूत बनले आहेत.

Story img Loader