उल्हासनगरमधील सत्ताधाऱ्यांचे पोलीस आयुक्तांना साकडे
शहर विकास आराखडय़ाविषयी चर्चा करण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या सर्वपक्षीय सभेत महापौर आशा इदनानी यांचे पती आणि साईपक्ष प्रमुख जीवन इदनानी यांना मारहाण करणारे माजी आमदार पप्पू कलानी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शहरातील सत्ताधारी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त के. पी. रघुवंशी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस आयुक्तांनी शिष्टमंडळास दिले.
गेल्या काही महिन्यांमध्ये पप्पू कलानी यांच्या गुन्हेगारी कारवाया पुन्हा वाढल्या आहेत. यापूर्वी त्यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यासमोरच पालिकेचे साहाय्यक आयुक्त युवराज भदाणे आणि डॉ. सागर घोलप यांना मारहाण केली होती. तसेच मनसेच्या कार्यालयाची नासधूस करण्यामागेही त्यांचा हात असल्याचा आरोप आहे. पप्पू कलानी दहशतीच्या माध्यमातून लोकप्रियता मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत, असेही आमदार कुमार आयलानी, महापौर आशा इदनानी, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, उपमहापौर जमनू पुरस्वानी, भाजप जिल्हाध्यक्ष महेश सुखरामानी, काँग्रेसचे जयराम लुल्ला यांच्या शिष्टमंडळाने नमूद केले आहे.
पप्पू कलानीला आवरा..
उल्हासनगरमधील सत्ताधाऱ्यांचे पोलीस आयुक्तांना साकडे शहर विकास आराखडय़ाविषयी चर्चा करण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या सर्वपक्षीय सभेत महापौर आशा इदनानी यांचे पती आणि साईपक्ष प्रमुख जीवन इदनानी यांना मारहाण करणारे माजी आमदार पप्पू कलानी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी
आणखी वाचा
First published on: 19-05-2013 at 02:40 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Controlled to pappu kalani