राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी भीमा साखर कारखाना निवडणूक प्रचारात विरोधकांवर टीका करताना वादग्रस्त व्यक्त केलं आहे. “पाटलाच्या पोराला लग्नाच्याही आधी यांच्याएवढी पोरं असतात. त्याचा आम्हाला अभिमान आहे,” असं वक्तव्य राजन पाटलांनी केलं. यानंतर यावरून वाद निर्माण झाला आहे. ते पंढरपूरमध्ये भीमा सहकारी कारखाना निवडणूक प्रचार सभेत बोलत होते.

राजन पाटील म्हणाले, “ही निवडणूक भीमा कारखान्याची आहे की राजन पाटलांच्या कुटुंबाची आहे हेच कळायला मार्ग नाही. ते आमच्या पोरांना बाळ म्हणत आहेत. अरे आम्ही पाटील आहोत. याला माहितीच नाही की, पाटलाच्या पोराला लग्नाच्याही आधी यांच्याएवढी पोरं असतात. त्याचा आम्हाला अभिमान आहे.”

“आमची मुलं वयाच्या १७ व्या वर्षी ३०२ चं कलम भोगणारी”

“ते आमच्या पोरांना भीती दाखवत आहेत. आमची मुलं वयाच्या १७ व्या वर्षी ३०२ चं कलम भोगणारी आहेत,” असंही वक्तव्य राजन पाटील यांनी केलं.

राजन पाटलांच्या वक्तव्यावर भाजपाची प्रतिक्रिया

हेही वाचा : जितेंद्र आव्हाडांना मोठा झटका, विवियाना मॉल मारहाणप्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

पंढरपुरात राष्ट्रवादी-भाजपा नेत्यांची युती

विशेष म्हणजे भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे राजन पाटील आणि भाजपाचे आमदार प्रशांत परिचारक यांनी एकत्र येत ‘भीमा बचाव परिवर्तन पॅनल’ उभा केला आहे. दुसरीकडे या विरोधात भाजपाचे खासदार धनंजय महाडिक यांची ‘भीमा शेतकरी विकास आघाडी’ आहे. त्यांचा प्रचार राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील करत आहेत.

Story img Loader