सहकारी साखर कारखानदारीची दशा

सर्वाधिक साखर कारखाने असलेल्या सोलापूर जिल्ह्य़ातील सहकारी साखर कारखानदारी गैरव्यवस्थापन, भ्रष्टाचार आणि कर्जाचे डोंगर आदी कारणांमुळे अडचणीत आली असतानाच दुसरीकडे खासगी कारखाने मात्र व्यवस्थित सुरू असल्याचे चित्र सध्या आहे. सहकारी कारखान्यांसाठी ही धोक्याची घंटा मानली जाते.

PepsiCo Eyes Stake in Haldiram Snacks
हल्दीराममधील हिस्सा खरेदीसाठी ‘बहुराष्ट्रीय’ चढाओढ; पेप्सिको, टेमासेक, ब्लॅकरॉकसारख्या कंपन्या आखाड्यात
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
overseas debt become expensive due to the depreciating rupee
रुपयाच्या अवमूल्यनामुळे परदेशातून कर्ज उभारणी महाग
zomato swiggy now sell their food products directly to consumer
झोमॅटो, स्विगीकडून आता त्यांच्या खाद्य उत्पादनांची थेट विक्री; हॉटेल व्यावसायिकांचा विरोध, कारवाईची सरकारकडे मागणी 
jaggery house on the banks of warna river remains closed
वारणा काठावरील गुऱ्हाळघरे झाली इतिहास जमा; जाणून घ्या, वारणा काठावर नेमकं काय झाले
Is ESOP or RSU better for employee welfare
कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी ‘ईसॉप’ की ‘आरएसयू’ चांगले?
SEBI is now also obsessed with AI to speed up the process Claims that work is underway on more than a dozen projects print eco news
प्रक्रियेत गतिमानतेसाठी सेबीचाही आता ‘एआय’ ध्यास! डझनभराहून अधिक प्रकल्पांवर काम सुरू असल्याचा दावा
massive dividend shareholders TCS IT company
मोठ्या आयटी कंपनीकडून भागधारकांना जबरदस्त ‘डिव्हीडंड’; अजूनही समभाग खरेदीची संधी

सोलापूर जिल्हय़ात सध्या सर्वाधिक १७ साखर कारखाने आहेत. यातील १७ सहकारी साखर कारखान्यांपैकी तीन साखर कारखाने पूर्णत: बंद झाले आहेत. दुसरीकडे सहकारमहर्षी (अकलूज), विठ्ठलराव शिंदे (माढा), पांडुरंग (श्रीपूर, माळशिरस) यांसारखे काही अपवाद वगळता अन्य सहकारी कारखानेही अडचणीत आहेत. जिल्हय़ात सध्या एकूण ऊसगाळपात सहकारी कारखान्यांचे प्रमाण ६० टक्के तर खासगी कारखान्यांचे ४० टक्के असे आहे.

भ्रष्टाचार, गैरव्यवस्थापन आणि कर्जाचा वाढता डोंगर यांमुळे सहकारी साखर कारखाने अडचणीत आले. याउलट खासगी कारखाने व्यवस्थित चालत असल्याचे बघायला मिळते. सहकारी कारखाना असताना हात धुऊन घ्यायचे आणि तोच कारखाना खासगी झाल्यावर व्यावसायिक पद्धतीने चालवायचा हे उद्योग खासगी कारखानदारांकडून केले जातात. परिणामी शेतकरी भरडले जातात.

अक्कलकोट भागात १९८३ च्या सुमारास माजी मंत्री पार्वती मलगोंडा यांनी इंदिरा सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीचा संकल्प सोडला होता; परंतु त्याला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कधीही अर्थसाहाय्य केले नाही. त्यामुळे १८ वर्षे रखडलेला हा कारखाना मलगोंडा यांनी आपले प्रतिस्पर्धी सिद्रामप्पा पाटील यांच्या ताब्यात दिल्यानंतरच तो कार्यान्वित झाला. परंतु  हा कारखाना पुढे बंदच झाला.

अक्कलकोट तालुक्यातील एकमेव सहकारी साखर कारखाना बंद पडत असताना दोन-दोन खासगी कारखाने मात्र जोमात सुरू झाले आहेत. काँग्रेसचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी दत्ता शिंदे यांच्या मदतीने तालुक्यातील दुधनीजवळ ‘मातोश्री लक्ष्मी’ तर धोत्री येथे ‘गोकुळ’ असे प्रत्येकी ३५०० मे. टन गाळप क्षमतेच्या दोन खासगी साखर कारखान्यांची उभारणी केली. शिवाय ‘मातोश्री’मध्ये १२ मेगावॉट तर ‘गोकुळ’मध्ये १५ मेगावॉट सहवीजनिर्मिती केली जाते. येत्या वर्षांत तडवळ येथेही गोकुळ-माउली साखर व सहवीजनिर्मिती कारखान्याची उभारणी होणार आहे.

मागील दोन-तीन वर्षांतील दुष्काळासह ऊसटंचाई, ऊसतोड मजूर टोळय़ांची वानवा आणि शासनाचे प्रतिकूल धोरण यामुळे कारखाना बंद पडला. – सिद्रामप्पा पाटील, अध्यक्ष, स्वामी समर्थ साखर कारखाना

सहकारी साखर कारखान्यासाठी वारंवार शासनाच्या धोरणांवर अवलंबून राहावे लागत असल्याने वेळेवर निर्णय घेता येत नाही, तर याउलट, खासगी साखर कारखान्याला गाळप परवाना व एफआरपी दराचा अपवाद वगळता शासनावर विसंबून राहावे लागत नाही. वेळेवर निर्णय, व्यवस्थापनकौशल्य, काटकसरीचा कारभार आणि विश्वासार्हता यामुळे खासगी साखर कारखान्याची प्रगती होते. – दत्ता शिंदे, व्यवस्थापकीय संचालक, गोकुळ शुगर इंडस्ट्रीज

 

 

Story img Loader