येथील साहाय्यक निरीक्षकासह अन्य एका पोलिसावर प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपाखाली दाखल झालेल्या गुन्ह्यातील महिनाभरापासून गायब असलेला संशयित राष्ट्रवादीचा नगरसेवक चंद्रकांत सोनार गुरुवारी अखेर स्वत:हूनच पोलिसांना शरण आला. न्यायालयाने त्याची ६ मेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. सोनार यांच्या दोन्ही मुलांना यापूर्वीच अटक झाली आहे.
२६ मार्च रोजी होळीच्या उत्सवावेळी जुने धुळे भागात टोळके हाती तलवार घेऊन दहशत निर्माण करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी गेलेल्या साहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय विक्रम पाटील (३९) यांच्यावर देवेंद्र ऊर्फ देवा चंद्रकांत सोनारने तलवारीने हल्ला चढविला होता. याच वेळी भूषण सोनारने संजय बोरसे या पोलिसावर वार केला होता. या संदर्भात पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून नगरसेवक चंद्रकांत सोनार, त्यांच्या दोन मुलांसह एकूण ३० जणांविरुद्ध दंगलीसह सरकारी कामात अडथळा आणणे आदी कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी देवा व भूषण सोनार, सचिन बडगुजर यांच्यासह सहा प्रमुख संशयितांना अटकही केली. हे संशयित सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. पण नगरसेवक चंद्रकात सोनार हा महिनाभरापासून फरार होता. गुरुवारी तो स्वत:हून न्यायालयासमोर हजर झाला. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता ६ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा