निखिल मेस्त्री

करोनामुळे शिक्षण व्यवस्था विस्कळीत; मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर

पालघर : करोनामुळे गेल्या दोन वर्षांत शिक्षण प्रक्रिया विस्कळीत झाली आहे. अलीकडेच राज्यात झालेल्या सर्वेक्षणामध्ये इतर जिल्ह्य़ांच्या तुलनेत पालघर जिल्ह्यत सर्वाधिक २२८५ शाळाबा मुले आढळली आहेत. त्यामुळे  शाळाबा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे मोठे आव्हान पालघरच्या शिक्षण विभागासमोर उभे आहे.

१ ते  १० मार्च या कालावधीत  राज्यामध्ये शाळाबा मुलांची शोधमोहीम राबविण्यात आली होती.  या मोहिमेमध्ये मुंबई, पुणे, नंदुरबार, अकोला, नाशिक या जिल्ह्यंसह पालघर जिल्ह्यत सर्वाधिक शाळाबा मुले असल्याचे समोर येत आहे. जिल्ह्यत २२८५ शाळाबा मुले असल्याचे आढळून आले आहे.  बहुतांश मुले ही करोनाच्या महामारीमुळे शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर राहिली असल्याचे  दिसून येते.  तर दुसरीकडे ग्रामीण भागातून शहरी भागाकडे रोजगारासाठी स्थलांतर करणारी कुटुंबे आपल्या मुलांना शहराकडे घेऊन जात असल्यामुळे मुले शाळेपासून वंचित राहतात. अशा स्थलांतर झालेल्यांचा आकडा मोठा  आहे.  जिल्ह्यमध्ये आदिवासी ग्रामीणबहुल भागांमध्ये पालकांसह शाळेत जाणारी मुलेही मजूर म्हणून कामावर जाऊन घरच्या आर्थिक परिस्थितीला हातभार लावत असल्याने ही मुलेही शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर जाण्याची शक्यता आहे.  असे असले तरी आढळलेल्या मुलांना शाळेत सामावून घेतल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे. तरी शाळा सुरू झाल्यानंतर मुलांना तेथे सामावून घेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

दरम्यान, पालघर जिल्ह्यत गाव, तालुका, जिल्हा सोडून स्थलांतर झालेली तीन हजार ८६५ मुले असून १६७२ मुले स्थलांतर होऊन आलेली आहेत. ही मुले शाळेच्या प्रवाहात आलेली आहेत की नाही, हे अजून स्पष्ट नाही. त्यामुळे शिक्षण विभागामार्फत या मुलांचे हमीपत्र व त्यांच्या पालकांची चौकशी केल्यानंतरच यातील किती विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आहेत हे स्पष्ट होईल.

आकडेवारीत तफावत

शाळाबा सर्वेक्षणामध्ये पालघर जिल्ह्यत असलेल्या मुलांपैकी काही मुले बालकामगार असल्याचेही सर्वेक्षणादरम्यान दिसले. राज्यात नाशिक ,पुणे जिल्ह्यपाठोपाठ पालघर या आदिवासीबहुल भागातील ३८ शाळाबा मुले बालकामगार असल्याचे शोधमोहिमेतून वास्तव उघड झाले आहे. जिल्ह्यत २२८५ शाळाबा मुले असल्याचे सर्वेक्षणात आढळले होते. मात्र सर्वेक्षण करताना एकाच विद्यार्थ्यांच्या दुबार नोंदी, तांत्रिक अडचणी यामुळे हा आकडा चुकीचा असून प्रत्यक्षात १७०५ विद्यार्थी शाळाबा असल्याचे पालघर शिक्षण विभागाने म्हटले आहे.

शाळाबा कोण ?

शाळेत कधीच दाखल न झालेले, प्रवेश घेऊन प्राथमिक शिक्षण अपूर्ण राहिलेले, सहा ते चौदा वयोगटातील एक महिन्याहून अधिक अनुपस्थित राहिलेल्या मुलांना शाळाबा म्हटले जाते. यात जन्मापासून शाळेत न गेलेल्या मुलांना ए वन (अ१) तर एक महिन्याहून अधिक गैरहजर असलेल्या १४ वयोगटातील मुलांना ए टू  (अ२) गट असे संबोधले जाते. विशेष शोध मोहिमेतून ही मुले वेळीच समोर आल्याने योग्य त्या नियोजनातून यातील बहुतांश मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. विद्या प्राधिकरणाच्या विशेष अभ्यासक्रमाद्वारे त्यांना शैक्षणिक धडे दिले जात आहेत.

सिद्धराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. पालघर

तालुकानिहाय शाळाबा विद्यार्थी

पालघर — १५०, डहाणू — ८०१, वसई — २९२, तलासरी — १७८, वाडा — ४५, विक्रमगड — १०९, जव्हार — ७८, मोखाडा — ५२

Story img Loader