राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार महाराष्ट्रात आज (१३ डिसेंबर) आणखी २ ओमायक्रॉन बाधित रूग्ण आढळले आहेत. यापैकी एक रुग्ण पुणे येथील आणि एक रुग्ण लातूर येथील आहे. आता राज्यातील एकूण ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्णांची संख्या २० वर पोहचली आहे. यात मुंबईत ५, पिंपरी चिंचवडमध्ये १०, पुणे मनपा क्षेत्रात २, कल्याण डोंबिवलीत १, नागपूरमध्ये १ आणि लातूरमध्ये १ रूग्ण आहे.

या २० ओमायक्रॉन रूग्णांपैकी ९ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आज आढळलेल्या ओमायक्रॉन बाधित दोन्ही रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. पुण्यातील रुग्ण ३९ वर्षाची महिला आहे, तर लातूरमधील रुग्ण ३३ वर्षाचा पुरुष आहे. सध्या दोघेही विलगीकरणात आहेत. या रूग्णांच्या प्रत्येकी ३ निकटसहवासितांची चाचणी करण्यात आली. त्यांचे कोविड रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. विशेष म्हणजे दोन्ही रुग्णांचे लसीकरण पूर्ण झाले होते.

newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Health Special Unsafe Environment and Mental Health Hldc
Health Special: असुरक्षित वातावरण आणि मानसिक स्वास्थ्य
Absence of doctors other staff at Aarey hospital beds Tribal patients suffering for treatment Mumbai print news
आरे रुग्णालय रुग्णशय्येवर डॉक्टर, अन्य कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती; आदिवासी रुग्णांची उपचारांसाठी पायपीट
Rakul Preet Singh Diet
Rakul Preet Singh Diet : सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत; रकुलने सांगितले डाएटचे सीक्रेट, वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
security guards at VN Desai Hospital , VN Desai Hospital,
डॉक्टरांच्या आंदोलनानंतर व्ही. एन. देसाई रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांमध्ये वाढ, मुंबई महानगरपालिका आयुक्तांसोबतच्या चर्चेनंतर निघाला तोडगा
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!

राज्यातील इतर करोना रूग्णांचे तपशील खालीलप्रमाणे,

राज्यात आज (१३ डिसेंबर) नव्याने ५६९ करोना रुग्ण आढळले. याशिवाय ५ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,६९,५८,६८१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,४४,४५२ (९.९२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ७४,१९० व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर ८८७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

हेही वाचा : Explained: ओमायक्रॉन संसर्गानंतर आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी भारतात कोणते नियम बदलले? वाचा…

राज्यात आज (१३ डिसेंबर) एकूण ४९८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण ६४,९३,००२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.७२ टक्के एवढे झाले आहे.

दरम्यान, १ नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत १०७ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी २० नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

राज्यातील सक्रीय करोना रुग्ण

राज्यात आज रोजी एकूण ६,५०७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात ५६९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,४४,४५२ झाली आहे.