राज्यात पुन्हा एकदा करोना संसर्ग हळूहळू वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून देखील खबरदारी घेतली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच टास्क फोर्स सोबत बैठक घेतली आणि नागरिकांना नियम पाळा, मास्क वापरा असे आवाहन केले आहे. तर, महाराष्ट्रात पुन्हा एकदा मास्कसक्ती लागू होण्याची चिन्ह दिसत आहेत. आज दिवसभरात राज्यात १ हजार ३५७ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. तर, आज रोजी राज्यात एकूण ५ हजार ८८८ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,९१,७०३ झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आज ५९५ रुग्ण बरे झाले असून, राज्यात आजपर्यंत एकूण ७७,३७,९५० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.०५ टक्के एवढे झाले आहे.

राज्यात आज १ करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,१०,३५,२७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,९१,७०३ (०९.७४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

ज्यात पुन्हा एकदा मास्कसक्ती लागू करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. यासंदर्भात आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मास्कसक्तीविषयी चर्चा सुरू असली, तरी राज्यात मास्कसक्ती नसल्याचं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. “मुंबई, पुणे, पालघर आणि रायगडचा काही भाग, ठाणे या भागात थोडीफार संख्या वाढत आहे. त्याला अनुसरून देशाच्या केंद्रीय आरोग्य विभागाच्या लोकांनी पत्र पाठवलं आहे की या विभागांसाठी तुम्हाला रुग्णसंख्या वाढ रोखण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतील. त्या बाबतीत परवा टास्क फोर्सच्या बैठकीत स्पष्टपणे ठरलं की जिथे गर्दीची ठिकाणं आहेत, तिथे मास्क वापरण्याचं आवाहन करावं. ते सक्तीचं नाही”, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.