पालघर जिल्ह्यात आतापर्यंत 11 करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून यामध्ये वसई -विरार महानगर पालिका क्षेत्रात 9 तर पालघर तालुक्यात 2 कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली आहे. या पैकी एक रुग्ण ग्रामीण रुग्णालय, पालघर येथे उपचार घेत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले आहे.

सद्यस्थितीस 406 परदेशीं प्रवाशांचा देखरेख कालावधी संपुष्टात आला असून विविध देशातुन प्रवास करून आलेले परदेशी प्रवासी, बाधित रुग्णांचे निकट सहवासातील व तीव्र श्वसन विकार असलेले 995 रुग्ण देखरेखीखाली ठेवण्यात आले आहेत. यापैकी 59 जणांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे तर 72 जणांचे घशातील नमुने तपासणीसाठी कस्तुरबा गांधी रुग्णालय येथे पाठविण्यात आले असून त्यांचा तपासणी अहवाल अप्राप्त आहे. 11 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 7 पॉझिटिव्ह रुग्ण कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे दाखल करण्यात आले असून 2 रुग्ण खाजगी रुग्णालयात दाखल आहेत. एका  रुग्णास ग्रामीण रुग्णालय, पालघर येथे दाखल करण्यात आले असून अन्य एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या रुग्णाचा परदेश प्रवासाचा इतिहास नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.

Story img Loader