करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयांचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कौतुक केलं. मुख्यमंत्र्यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला काळजी घेण्याच्या सूचना देत आहेत. या सगळ्या कामाबद्दल मी त्यांचे आभार मानतो,’ असं कौतुक करतानाच ‘या संकटाचा मुकाबला करत असताना आम्ही सर्वजण एकजुटीनं राज्य सरकारसोबत आहोत,’ अशी ग्वाही रामदास आठवले यांनी दिली.

राज्यात करोनामुळे अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. करोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी लॉकडाउन लागू करण्यात आला. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प आहेत. या सर्व संकटाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सातत्यानं जनतेशी संवाद साधून धीर देत आहेत. सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबद्दल माहिती देत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या संवादाचं आयपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कौतुक केलं आहे.

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार व्यक्त करतो. त्यांनी करोनाच्या संदर्भात लोकांना काळजी घेण्याच्या अनेक आदेश त्यांनी दिले आहेत. करोना राज्यात आणि मुंबईत वाढू नये यासाठी ते सातत्यानं प्रयत्न करत आहेत. परंतु अशा पद्धतीची नैसर्गिक संकट येतात. महामारीसारख्या रोगांचा प्रादुर्भाव राज्यात होतो. त्यावेळेला सर्व लोकांना विश्वासात घेण्याची परंपरा आहे. कोरोनासारख्या महासंकटाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व पक्षीय बैठक आयोजित करून सर्वांना विश्वासात घ्यावे. आम्ही राज्यात सत्तेत नसलो विरोधी पक्ष असलो तरी कोरोना विरुद्ध च्या लढाईत आम्ही सर्व एकजुटीने सरकार सोबत आहोत,’ असं रामदास आठवले म्हणाले.

… मै बिनती करता हूँ हात जोडकर

‘कोई ना निकले रोड पर… मै बिनती करता हू आपको हात जोडकर…
घरमें रहकर साफ रखो अपना घर… फिर करोना से हमें बिल्कुल नही होगा डर…
करोना का हमें किल्ला करना है सर… इसलिए कोई ना आये रोडपर
अशी कविता ट्विट करून रामदास आठवले यांनी राज्यातील जनतेला घरात राहण्याचं आवाहन केलं आहे.

करोनानं देशात आणि राज्यात शिवकाव केल्यानंतर रामदास आठवले यांनी गो करोना गो, अशा घोषणा दिल्या होत्या. त्यामुळे ते बरेच चर्चेत आले. त्यानंतर सातत्यानं आपल्या कवितांमधून ते करोनाविषयी भाष्य करत आहेत. लोकांना वेगळ्या पद्धतीनं काळजी घेण्याचं आवाहन करत आहेत.