महाराष्ट्रात दिवसभरात १० हजार २३० करोनाबाधित रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या ४ लाख २२ हजार ११८ वर पोहोचली आहे. तर २६५ जणांचा मृत्यू झाला असून मृतसंख्या १४ हजार ९९४ इतकी झाली आहे. दिवसभरात ७५४३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत २ लाख ५६ हजार १५८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घऱी पाठवण्यात आलं आहे. आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

राज्याचा रिकव्हरी रेट सध्या ६०.६८ टक्के आहे. तर मृत्यूदर ३.५५ टक्के आहे. आतापर्यंत २१ लाख ३० हजार ९८ चाचण्या करण्यात आल्या असून यामधील ४ लाख २२ हजार ११८ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

सध्या ८ लाख ९९ हजार ५५७ जणा होम क्वारंटाइन आहेत. तर ३९ हजार ५३५ जण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

Story img Loader