करोना व्हायरसचा फैलाव वाढत असल्याने राज्य सरकारने मोठा निर्णय घेत महाराष्ट्रातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद करण्याचा आदेश दिला आहे. याशिवाय सर्व परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी सूचना कुलगुरु आणि संबंधित विभागांना देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसंच निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात येतील का यासंबंधी निवडणूक आयोगाकडे विचारणा केली असल्याचंही त्यांनी सांगितलं.

राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती देताना करोनाची लागण झाल्याने घरात विलगीकरण करून ठेवलेल्यांच्या हातावर शिक्का मारणार असल्याचं सांगितलं. तो रूग्ण कळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. रेल्वेच्या अधिकाऱ्यांना बोलवण्यात आले होते. रेल्वे स्वच्छ करण्याच्या तसंच सॅनिटाझर ठेवा, गर्दी कमी करा अशा सूचना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

High Court orders Mumbai Police regarding atrocity case against Nawab Malik Mumbai news
मलिक यांच्याविरोधातील ॲट्रोसिटी प्रकरणाचा तपास चार आठवड्यांत पूर्ण करा; उच्च न्यायालयाचे मुंबई पोलिसांना आदेश
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
principal suspended for negligence in duty in midday meal food poisoning case pmd
वर्धा : कर्तव्यात कसुर; मुख्याध्यापक निलंबित; शालेय पोषण आहार विषबाधा प्रकरण
state government decision 50 thousand teachers will get 20 percent subsidy increase
शिक्षकांसाठी मोठी बातमी! वेतनात २० टक्के वाढ होणार?
29 villages, Vasai, Vasai latest news, Vasai marathi news,
वसई : २९ गावांचे प्रकरण तापले, सुनावणीची प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा आरोप
snake bites disease
सर्पदंश हा आजार मानला जाणार? कारण काय? याला अधिसूचित आजार घोषित करण्याची मागणी केंद्राकडून का होत आहे?
Supreme Court News
Supreme Court : कामाच्या ठिकाणी भेदभाव झाल्याचा ट्रान्सवुमन शिक्षिकेचा आरोप, सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवरील निकाल ठेवला राखून
pune municipality suffered financial loss due to state government decision
Pune Municipal Corporation : महापालिकेला का सोसवेना समाविष्ट गावांचा भार, काय आहे नक्की कारण?

दरम्यान मंत्रालयात सर्वसामान्यांना प्रवेश बंद करण्यात आला असून मंत्रालयात कोणीही येऊ नये असं आवाहन त्यांनी केलं. राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आला असून त्यांना जास्त लोकांना बोलावू नका. ईमेलचा वापर करा असं सांगण्यात आलं आहे. जिथे अनावश्यक फक्त मनोरंजनासाठी गर्दी केली जाते. त्याठिकाणी जमावबंदी लागू करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

आणखी वाचा- Coronavirus: ‘त्या’ प्रवाशांच्या बोटाला लावणार शाई; आरोग्यमंत्र्यांची माहिती

केंद्र सरकारने जारी केलेल्या सात करोनाग्रस्त देशांच्या यादीमध्ये तीन नवीन देशांचा समावेश करण्यात आला असून. यामध्ये दुबई, अमेरिका आणि सौदी अरेबियातून येणाऱ्यांचीही चाचणी घेतली जाईल असं टोपे यांनी स्पष्ट केलं. करोनाग्रस्त देशांमधून येणाऱ्या रुग्णांची तीन प्रकारांमध्ये विभागी करण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितलं. “दहा करोनाग्रस्त देशांमधून येणाऱ्या लोकांना ए, बी आणि सी प्रकारामध्ये विभागले जाणार आहे,” असं टोपे यांनी सांगितलं. नक्की हे वर्गिकरण कसे असणार आहे याबद्दलही टोपे यांनी माहिती दिली. जाणून घेऊयात कसं होणार हे वर्गीकरण…

– यामध्ये ज्यांच्यामध्ये थेट करोनाची लक्षणे दिसत आहेत असे प्रवासी. त्यांना थेट आयसोलेशन वॉर्डमध्ये पाठवणार आहोत. त्यांच्या चाचण्या करुन त्याप्रमाणे त्यांच्यावरील उपचारांचा निर्णय घेण्यात येईल.

बी – यामध्ये वयोवृद्ध लोकं आहेत. ज्यांना मधुमेह किंवा इतर आजारांचा त्रास आहे त्यांचा बी प्रकारामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यांच्या चाचण्या करुन काही अढळल्यास पुढील उपचार त्यांच्यावर करण्यात येतील.

सी – यामध्ये तरुण मुले ज्यांच्यामध्ये कुठलीही लक्षणे नाहीत. त्यांची प्राथमिक तपासणी करुन त्यांना होम क्वॉरंटाइन केले जाईल.

Story img Loader