जगभरात थैमान घालणाऱ्या करोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस राज्यात वाढतच आहे. करोनाबाधितांसह करोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा वाढताना दिसत आहे. सातारामध्ये आज पहाटे करोनामुळे एकाचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील हा पहिला बळी ठरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कॅलिफोर्नियावरुन आलेल्या या 63 वर्षीय व्यक्तीचा आज पहाटे सातारा येथे मृत्यू झाला. 14 दिवसांपूर्वी त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. याच रुग्णाचे कालच्या फेर तपासणीत रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. दुसऱ्या चाचणीसाठी रुग्णांचे नमुने तापसणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. दुसरा नकारात्मक अहवाल आल्यावर त्यांना आज किंवा पुढील दोन दिवसात घरी सोडण्यात येणार होते.मात्र, त्यांचा आज सकाळी करोनामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोना पॉझिटिव्हचे चार रुग्ण सध्या साताऱ्यात आढळले आहेत.