चंद्रपूर शहरात टाळेबंदीचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. बहुसंख्य लोक आज कामानिमित्ताने घराबाहेर पडल्याने जटपुरा गेट येथे गर्दी उसळली होती. दरम्यान ही गर्दी सांभाळतांना पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली. यावेळी असंख्य दुचाकी व चारचाकी वाहने जप्त करतांना शेकडो लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

करोना विषाणूचा संसर्ग होवू नये म्हणून सर्वत्र टाळेबंदी आहे. मात्र बऱ्याच दिवसांपासून घरी बसून कंटाळलेली लोकं अखेर आज आठवड्याचा पहिला दिवस असल्याने भाजीपाला, किराणा तसेच इतर वस्तू खरेदीसाठी घराबाहेर पडली होती. त्यामुळे टाळेबंदीचा शहरात पूर्णत: फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले. तुकूम परिसरात जवळपास ७० टक्के दुकाने सुरू होती. त्यामुळे या भागात लोकांची चांगलीच गर्दी झाली होती. तोच प्रकार शहरात सर्वत्र बघायला मिळाला. पोलीस दलाचे अधिकारी व शिपाई सलग २४ तास कर्तव्य बजावून थकले आहेत. अशातच पोलिसांची गस्त थोडी शिथील होताच लोकांची रस्त्यावर गर्दी उसळली. ही गर्दी सांभाळतांना पोलिसांची तारांबळ उडाली. जटपूरा गेट व गांधी चौकात तर पोलिसांनी प्रत्येक वाहनांची तपासणी सुरू केली. ज्यांच्याकडे पास आहे आणि ज्यांचे वैद्यकीय काम आहे अशांनाच सोडण्यात आले. इतर सर्वांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्यामुळे जटपूरा गेट येथे रसराज हॉटेलपर्यंत वाहनांची लाईन लागली होती. इतक्या मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरल्याने बहुसंख्य लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर अनेकांची वाहने जप्त करण्यात आली. ३ मे पर्यंत टाळेबंदी आहे. त्यामुळे लोकांनी टाळेबंदीचे नियम पाळावेत असे आवाहन पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी केले. जटपूरा गेट येथे स्वत: पोलिस अधिक्षक डॉ.रेड्डी यांनी वाहनांची तपासणी केली.

आणखी वाचा- मास्क न घातल्याने पोलिसांकडून CRPF जवानाला बेदम मारहाण, साखळीने बांधून ठेवल्याने नागरिकांमध्ये संताप

सिकंदराबाद येथून पायी आलेल्या दहा ते बारा युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या सर्वांना सध्या विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तसेच रविवारी रात्री ४० जण अशाच पध्दतीने शहरात दाखल झाले. त्या सर्वांनाही विलगीकरणात ठेवले गेले आहे.