शहरातील पाणी, स्वच्छता व आरोग्य या नागरिकांच्या जिव्हाळय़ाच्या प्रश्नांवर महापालिकेची सर्वसाधारण सभा मॅरेथॉन ठरली. सभेत आयुक्त राहुल रेखावार यांनी पुढच्या सभेपर्यंत सर्व प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देऊनही नगरसेवकांनी रात्री उशिरापर्यंत चच्रेचे गुऱ्हाळ चालूच ठेवले. दरम्यान, पाणीप्रश्नावर विरोधी पक्षनेत्या अंबिका डहाळे व शिवसेना नगरसेवकांनी महापालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांना बेशरमीच्या झाडाचा पुष्पगुच्छ करून देण्याचा प्रयत्न बठकीच्या सुरुवातीलाच केल्याने काही काळ गोंधळ उडाला.
महापौर संगीता वडकर यांच्या अध्यक्षतेखाली बी. रघुनाथ सभागृहात ही सभा पार पडली. सभेत सदस्यांच्या प्रश्नांच्या भडिमाराला आयुक्त रेखावार यांनी दमदार उत्तरे दिली. उपमहापौर भगवान वाघमारे, प्रभारी नगरसचिव चंद्रकांत पवार उपस्थित होते. केंद्र सरकारच्या अमृत योजनेसह महाराष्ट्र स्मार्ट सिटीचा लाभ घेण्यासाठी परभणी महापालिकेचा आíथकस्तर उंचावण्याची गरज आहे. तसेच दोन्ही योजनांसाठी लागणाऱ्या निकषांची पूर्तता करण्यावरच भर राहणार आहे, अशी माहिती रेखावार यांनी सभेत दिली. केंद्र सरकारने महापालिका क्षेत्रासाठी सुरू केलेल्या अमृत या नवीन योजनेत सहभागी महापालिकांना पाणीपुरवठा, रस्ते यासह अन्य पाच क्षेत्रांसाठी मोठा निधी मिळणार आहे. यात राज्य सरकार व महापालिकेचाही वाटा राहणार आहे. मात्र, या योजनेसाठी असलेले निकष सध्या तरी महापालिका पूर्ण करू शकत नाही. हे निकष पूर्ण करण्यास महापालिकेला पुढाकार घ्यावा लागणार आहे. केंद्राप्रमाणे राज्य सरकारने सुरू केलेल्या स्मार्ट सिटी योजनेचे निकष केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेसारखेच आहेत. त्यामुळे पहिल्यांदा हे निकष पूर्ण करण्यावर भर द्यावा लागणार आहे. स्वच्छ भारत अभियानातील शौचालयाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आपले लक्ष आहे, असेही रेखावार यांनी सांगितले. कंत्राटी कामगारांना कायम करण्याची मागणी सदस्यांनी केली असता, १९९९पूर्वी नियमित सेवेत असणाऱ्यांची यादी मागवून त्यावर विचार केला जाईल, असे आयुक्तांनी जाहीर केले. शहरातील आरोग्य विभागाला होणारा औषधपुरवठा यापुढे जि.प.च्या धर्तीवर खरेदी केला जाईल. शिवसेनेच्या सदस्यांनी महापालिका रुग्णालयातील समस्या लावून धरल्या. पुढच्या सभेपर्यंत शहरातील स्वच्छतेचा आराखडा तयार होईल.
पाणीप्रश्नाप्रमाणेच शहर स्वच्छता व आरोग्य या मूलभूत सुविधा नागरिकांना मिळत नसल्याचा मुद्दा सदस्यांनी वारंवार उपस्थित केला. स्वच्छता विभागाचे प्रमुख करण गायकवाड यांचे पद काढून घेण्याबाबतही चर्चा झाली. नगरसेवक माजूलाला यांनी त्यांना निलंबित करावे, यासाठी आग्रह धरला. डहाळे यांनी महापालिकेच्या घंटागाडय़ांबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर ६५ पकी २५ घंटागाडय़ा नादुरुस्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
अध्रे सभागृह रिकामे
सभा तीन वाजता सुरू झाली, मात्र काही वेळानंतर सदस्य बाहेर ऊठ-बस करीत होते. साडेचारच्या दरम्यान अध्रे सभागृह रिकामे झाले. केवळ दोन-तीन नगरसेवकच सातत्याने प्रश्न मांडत असताना दिसले. पाच वाजता अध्र्याहून अधिक सदस्यांनी सभागृह सोडले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा