शहरातील लोकांना परवडेल व रुचेल अशीच घरपट्टी लोकांना बसवण्यात येणार असून या विशेष विषयासाठी सर्व नगरसेवकांची लवकरच विशेष सभा घेण्यात येणार असून यामध्ये शहरी नागरिकांच्या हिताचाच निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही मुरुड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा कल्पना पाटील यांनी कोळीवाडा परिसरातील नागरिकांना दिले. कोळी समाजाच्या व्यथा ऐकण्यासाठी नगर परिषदेच्या शिष्टमंडळासमवेत त्यांनी कोळी समाजास भेट दिली. या वेळी त्यांच्या समवेत नगरसेविका स्नेहा पाटील, मेघाली पाटील, दीप्ती खेडेकर, नगरसेवक संदीप पाटील, मुख्याधिकारी बाळासाहेब जगताप व कर्मचारीवृंद उपस्थित होते. या वेळी मनोहर मकू  यांनी मासळी मार्केटबाबत विचारणा केली असता येत्या फेब्रुवारीपर्यंत नवीन मासळी मार्केट समाजाच्या स्वाधीन केले जाईल, असे आश्वासन नगराध्यक्ष यांनी दिले. कोळीवाडा परिसरातील नागरिकांसाठी लवकरात लवकर नवीन शौचालय बांधणार असून त्याची अंमलबजावणी लवकरच होणार असल्याचेही या वेळी त्यांनी सांगितले. कोळीवाडा परिसरातील गटारे यांच्यासाठी नवीन एस्टिमेट बनवून याबाबतची कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी समाजाने आमचा कोळीवाडा परिसर हा डी झोनमध्ये टाकण्यात यावा अशी मागणी केली. यावर नगराध्यक्षांनी लवकरच ठराव घेऊन त्याची अंमलबजावणीसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. या वेळी नगराध्यक्षा कल्पना पाटील यांनी अभिवचन दिले की, कोळीवाडा परिसरातील जास्तीत जास्त समस्या सोडवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या वेळी कोळी समाजाचे अध्यक्ष बाळकृष्ण गोंजी, प्रकाश सारंग, संदीप श्रीवर्धनकर, मनोहर मकू किसन बळी, अरुष केंडू, पांडुरंग गोंजी, नरू कुलाबकर, नरू पाटील आदी मंडळी उपस्थित होती.

Story img Loader