पत्नीच्या नावे जमीन करण्यासाठी ६ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिगंबर बाळासाहेब देशमुख या तलाठय़ाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने पकडले. बुधवारी सकाळी मुखेड तहसील कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.
मुखेड तालुक्यातील जिरगा येथील राजेंद्र कांबळे यांनी स्वत:च्या नावावर असलेली जमीन पत्नीच्या नावे करावी, यासाठी प्रस्ताव सादर केला होता. प्रस्ताव मंजूर करण्यास सकनूर सज्जाचे तलाठी दिगंबर देशमुख (वय २६, चिकाळा, तालुका मुदखेड) याने ६ हजार रुपयांची लाच मागितली. कांबळे यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपतच्या पथकाने सापळा रचला. लाचखोर देशमुख अविवाहित असून त्याच्यासह नोकरीत रुजू झालेल्या एका तलाठय़ावर सहा महिन्यांपूर्वी अशीच कारवाई झाली होती.

Story img Loader