कराड :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसवर ७० हजार कोटी रुपयांच्या भष्ट्राचाराचा आरोप ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार आणि कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या उल्लेखासह केला होता. आता याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि ज्यांच्यावर गंभीर आरोप आहेत. अशा नेत्यांनाच आज मंत्रीपदाची शपथ दिली गेली. हा राजकारणातला मोठा विरोधाभास असून, राष्ट्रवादीतील या फुटीर गटाला आपण ईडी गट म्हणत असल्याचा हल्लाबोल काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना केला.

चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी ७० हजार कोटींच्या भष्ट्राचाराचा आरोप केल्यानंतरच राजकीय घडामोडींना वेग आला. अजित पवार, छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा मोठा गट राज्य सरकारमध्ये सामील झाला. मी याचे दोन प्रकारे विश्लेषण करतो.

Pankaja Munde
Pankaja Munde : बीड जिल्ह्यातील तणावाच्या परिस्थितीवर पंकजा मुंडेंचं मोठं विधान; म्हणाल्या, “मी गृहमंत्र्यांशी…”
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
Hemlata Patil
Hemlata Patil : काँग्रेसला मोठा धक्का? ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रवक्त्या डॉ.हेमलता पाटील पक्ष सोडणार?
uddhav Thackeray Devendra fadnavis
“पुढील मकर संक्रांतीपर्यंत ठाकरे-फडणवीस एकत्र”, आमदार रवी राणांचा दावा
nana patole loksatta news
Nana Patole : “बीड, परभणीच्या घटना सरकार प्रायोजित”, नाना पटोलेंनी सांगितले घटनांमागील…
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Controversy over MLA Suresh Khades statement about Miraj constituency as mini Pakistan
मिरजेच्या उल्लेखावरून वातावरण तापले

हेही वाचा >>> अजित पवार निधी देत नव्हते मग युतीत कसे आले? एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर, म्हणाले, “आता मी…”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय विधानसभाध्यक्षांना ९० दिवसात म्हणजेच १० ऑगस्टपूर्वी द्यायचा आहे. त्यात या १६ जणांचे निलंबन करावेच लागणार आहे आणि हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपद पुन्हा रिक्त होईल आणि आजची घडामोड त्याचीच पूर्वतयारी असल्याची टीका चव्हाणांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकसभा निवडणूक जिंकायचीच असल्याने महाराष्ट्रातील मुख्यमंत्री शिंदेंच्या आमदारांचे आणि भाजपच्या प्रामाणिक आमदारांचे काय होतय याची चिंता नाही. कर्नाटक विधानसभेतील मोठ्या पराभवानंतर भाजपचा दक्षिण भारताचा दरवाजा बंद झालेला आहे. लवकरच मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तिसगढ या राज्यांच्या निवडणुकातही काँग्रेसचा विजय निश्चित असेल आणि या साऱ्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन कमळमधून सरकार बदलांचा प्रयत्न आहे. भाजपच्या बी टीम म्हणून काम करणाऱ्या पक्षसंघटनांचाही आगामी निवडणुकात धुव्वा उडणार असल्याचा इशारा चव्हाण यांनी दिला.

हेही वाचा >>> एक वर्षापूर्वीच जयंत पाटलांनी अजित पवार यांना दिली होती ‘ही’ ऑफर, म्हणाले होते “तुम्हीच…”

‘राष्ट्रवादी’मधील फुटीर ईडी गटातील लोकांनी आपल्याला रात्री चांगली झोप लागावी म्हणून पक्षांतर केले आहे. ‘राष्ट्रवादी’चे एकूण ५३ आमदार आहेत. तरी पक्षांतर बंदी कायद्यानुसार दोन तृतीयांश म्हणजेच ३६ हून अधिक आमदार अजित पवारांसोबत आहेत का हे महत्वाचे आहे. अन्यथा या आमदारांवरही अपात्रतेची टांगती तलवार असेल असे चव्हाण यांनी सांगितले. एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेनेतून फुटताना अजित पवारांनी निधी देताना व अन्य गोष्टीत त्रास दिल्याचे म्हटले होते. आता त्याच अजित पवारांच्या हाताखाली त्यांना काम करावे लागणार आहे. आजच्या शपथविधीवेळी शिंदे गटाच्या मंत्री व आमदारांच्या चेहऱ्यावरील भाव बरेच काही सांगत होते असा टोला पृथ्वीराज चव्हाणांनी लगावला. शरद पवार हे पुरोगामी विचारांचे ज्येष्ठ नेते आहेत. ते कदापि भाजपसोबत जाणार नसल्याचा आपला विश्वास आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून जातीयवादी पक्षांना रोखण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी मतविभागणी टाळण्यासाठी एकास एक उमेदवार देऊन येतील त्यांना सोबत घेऊन तसेच सोडून जातील त्यांच्याशिवाय लढा देणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले. सत्तेसाठी मोदी कोणतीही तडजोड करतील पण जनता ईडीला घाबरणार नसल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Story img Loader