वाई:धोम वाई खून खटल्यात आरोपीला वकीला शिवाय खटला चालवता येणार नाही अशी सूचना करत खटल्या कामी वेळ काढू पणा करता येणार नाही अशी समज न्यायालयाने आरोपी संतोष पोळ याला आज केली.धोम वाई खून खटल्याची सुनावणी वाई येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एस जी नंदीमठ यांच्या न्यायालयात सुरु आहे. माफीची साक्षीदार ज्योती मांढरेचा  उलट तपास आज पुन्हा पुढे सुरु होणार होता.सुनावणीच्या वेळी आरोपी संतोष पोळ ला वकिलाशिवाय स्वतः खटला चालवता येणार नाही. त्याला खटला चालवण्यासाठी वकील नेमावाच लागेल अशी सूचना न्यायालयाने केली.न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत वकील नेमण्यासाठी संतोष पोळला सांगितले आहे.

हेही वाचा >>> राज्यभर पावसामुळे दाणादाण, सरासरीपेक्षा किती पाऊस झाला? सरकारने दिली महत्त्वाची माहिती

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

आजच्या सुनावणी साठी सरकारी वकील ॲड उज्वल निकम हे वाई न्यायालयात आले होते. संतोष पोळ यालाही बंदोबस्तात न्यायालयात आणण्यात आले होते. यावेळी जिल्हा सरकारी वकील मिलिंद ओक न्यायालयात उपस्थित होते. मागील दोन सुनावणीत पोळ याने माफीची साक्षीदार ज्योती मांढरेचा उलट तपास घेतला होता.आज  पुन्हा तिचा  उलट तपास पुढे  सुरु होणार होता.

हेही वाचा >>> “अजित पवार नक्कीच मुख्यमंत्री होणार”, प्रफुल्ल पटेलांच्या वक्तव्यावर गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया चर्चेत

यावेळी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी पोळने उलट तपास घेण्यास हरकत घेतली. पोळ उलट तपासात विचारत असलेल्या प्रश्नांना कोणताही कायदेशीर (लॉ पॉईंट) आधार नाही. खटल्याशी विसंगत प्रश्न तो साक्षीदार ला विचारत असल्याचे यावेळी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.  तसेच खटल्यामध्ये तो   वेळ काढून पणा करत आहे. त्यामुळे संतोष पोळला स्वतः खटला चालवता येणार नाही आदी मुद्दे त्यांनी न्यायालयासमोर  आणले.त्यावर न्यायालयाने संतोष पोळ ला  खटल्याकामी वेळ काढू पणा करता येणार नाही अशी समज दिली. त्याला खटला चालवण्यासाठी वकील नेमावाच लागेल अशी सूचना न्यायालयाने केली.जर तू वकील नेमू शकत नसशील तर आम्ही तुला वकील देऊ असे न्यायालयाने  पोळ याला सांगितले.  न्यायालयाने पुढच्या तारखेपर्यंत वकील नेमण्यास संतोष पोळ सांगितले आहे. पुढच्या सुनावणीच्या वेळी वकील नेमतो असे त्याने  न्यायालयास सांगितले यानंतर न्यायालयाने दि १९ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे.

Story img Loader