वाई:क्षेत्र महाबळेश्वर देवस्थानची १६६ एकर जमीन ताब्यात देण्याचे भाडे पट्टीच्या थकबाकीची रक्कम देवस्थानला सहा टक्के व्याजासह देण्याचा आदेश दिल्याने वन विभागाला मोठा झटका बसला आहे.महाबळेश्वर येथील वेण्णा लेक परिसरातील एकूण १६६ एकर मिळकत ही वन विभागाने देवस्थान कडून १९४३ साली साठ वर्षाच्या कराराने भाडेपट्ट्यावर तात्कालीन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने घेतली होती. यावेळी झालेल्या कराराप्रमाणे मिळकतीचे वार्षिक चार आणे एकरी भाडे आणि या जमिनीतून मिळणाऱ्या फायद्यामधून ५० टक्के उत्पन्न श्री क्षेत्र महाबळेश्वर देवस्थानला देण्याचे मान्य केले होते. परंतू १९७५ सालापासून वन विभागाने भाडे देणे बंद केले व फायदा देखील देण्यास नकार दिला. देवस्थानने याबाबत अनेकवेळा मागणी केल्यास महाराष्ट्र खाजगी वन कायदा चा दाखला देऊन सदरची जमीन ही वन विभागाची असल्याचे दावा करत या मिळकतीवर आपला हक्क दाखवू लागले. यामुळे श्री क्षेत्र महाबळेश्वर देवस्थान ट्रस्टने वन विभागाच्या विरोधात १९९६ साली उत्पन्न मिळावे यासाठी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला व २००५ साली भाडेपट्टा करार संपल्याने मिळकत ताब्यात मिळावी यासाठी वेगळा दावा दाखल केला. अखेर २७ वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर अखेर दिवाणी न्यायालयातून श्री क्षेत्र महाबळेश्वर देवस्थानला न्याय मिळाला व वन विभागाला मिळकत ताब्यात देण्याचे आदेश दिले तसेच उत्पन्नाबाबत देखील पूर्ण हिशोब करुन ६ टक्के व्याजासह देवस्थानला उत्पन्न देण्याचे आदेश दिले.
क्षेत्र महाबळेश्वर देवस्थानची १६६ एकर जमीन ताब्यात देण्याचे वन विभागाला न्यायालयाचे आदेश; २७ वर्षांनी मिळाला न्याय
क्षेत्र महाबळेश्वर देवस्थानची १६६ एकर जमीन ताब्यात देण्याचे भाडे पट्टीच्या थकबाकीची रक्कम देवस्थानला सहा टक्के व्याजासह देण्याचा आदेश दिल्याने वन विभागाला मोठा झटका बसला आहे.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-10-2023 at 19:36 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Court order to forest department to take over 166 acres of land of kshetra mahabaleshwar temple amy