राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर दाखल बलात्काराच्या गुन्ह्यात काहीही तथ्य नसल्याचा पोलिसांनी दिलेला ‘बी समरी अहवाल’ प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सचिन न्याहारकर यांनी फेटाळला. “या प्रकरणात राजकीय दबावाखाली तपासी अधिकाऱ्यांनी तपास केल्याचे दिसत आहे. तक्रारदार तथा पीडितेच्या म्हणण्याऐवजी आरोपीच्या म्हणण्याच्या अनुषंगाने तपास करण्यात आला आहे. तसेच तक्रारदारालाच या प्रकरणात खोटे ठरवण्याचा प्रयत्न केलेला दिसत असून या प्रकरणात आता सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षकांनी तपास करावा. त्यात पोलीस आयुक्तांनी योग्य त्या सूचना देऊन मार्गदर्शन करावे”, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. तसेच पोलिसांनी दिलेल्या बी समरी अहवालात सहायक सरकारी वकील जयमाला राठोड यांनी योग्य ते पुरावे जोडलेले नसून स्वीकारणे योग्य नाही. त्यामुळे हा अहवाल रद्द करावा, असे न्यायालयात सांगितले.

सहायक पोलीस आयुक्त निशिकांत भुजबळ यांनी बी समरी अहवाल न्यायालयात सादर केला आहे. या प्रकरणी पीडितेने आपले म्हणणे मांडण्यासाठी अ‍ॅड. आय. डी. मनियार यांच्यामार्फत अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब ईब्राहिम शेख (रा. शिरूर जि. बीड) यांच्याविरुद्ध २८ डिसेंबर २०२० रोजी सिडको पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २९ वर्षीय पीडित तरुणी उच्च शिक्षित असून औरंगाबादेतील बायजीपुरा भागात भाड्याने राहते. नोकरीचे आमिष दाखवून मुंबईला नेण्यासाठी म्हणून १४ नोव्हेंबर २०२० रोजी रात्री शेख यांनी कारमध्येच अत्याचार केला. आपण प्रतिकारही केला. मात्र, तोंड दाबून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. पीडितेने केलेले आरोप मेहबूब शेख याने समाजमाध्यमावरून प्रतिक्रिया देत फेटाळले होते. पोलिसांनी तपास करून या प्रकरणात कुठलेही तथ्य नसून पीडिता आणि आरोपी यांची भेट झाल्याबद्दलही शंका उपस्थित केली होती.

Mumbai crime
मुंबई : आरोपीचा न्यायालातून पळून जाण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
class 6 girl school raped in Porbandar
शिक्षकाचा सहावीतल्या विद्यार्थीनीवर बलात्कार; वाच्यता केल्यास खिडकीतून फेकण्याची दिली होती धमकी
baba siddique
सिद्दिकी हत्येप्रकरणी पुन्हा चौकशी करा,झिशानला माहीत असलेले सत्य बाहेर येईल; अनिल परब
woman alleges rape after locking in home forced for religious conversion
पुणे : धर्मांतर करण्यासाठी महिलेला डांबून ठेवून बलात्कार; विमानतळ पोलिसांकडून महिलेसह तिघांना अटक
RG Kar rape-murder case verdict
RG Kar Rape-Murder Case : संजय रॉयला फाशीऐवजी जन्मठेप का झाली?
badlapur akshay shinde encounter
पाच पोलिसांमुळेच आरोपीचा मृत्यू, बदलापूरप्रकरणी चौकशी अहवालातील निष्कर्ष
RG Kar Medical College Kolkata Case Verdict Updates in Marathi
RG Kar Doctor Rape Case Verdict : ‘कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरण हे दुर्मिळातलं दुर्मीळ’ संजय रॉयला फाशी देण्याची सीबीआयची मागणी

“वाघ आहे मी लक्षात ठेवा; कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही,” चित्रा वाघ यांचं ट्वीट चर्चेत

सीसीटीव्हीतही दोघे कुठे भेटल्याचे दिसत नाही, असे पोलिसांनी सांगितले होते. त्यावरून पोलिसांकडून बी समरी अहवाल सादर करण्यात आला असून न्यायालयाने वरील मुद्दे उपस्थित करून फेटाळला. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठापुढे हे प्रकरण आले, तेव्हा न्यायालयानेही पोलिसांच्या तपासावर ताशेरे ओढले होते. 

Story img Loader