राज्यातील करोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असून २५ जिल्ह्यांमधील निर्बध राज्य सरकारकडून शिथिल करण्यात आले आहेत. मात्र करोनाचं संकट अद्यापही पूर्णपणे टळलं नसल्याने राज्य सरकार वारंवार खबरदारी घेण्याचं आवाहन करत आहे. दरम्यान यावर्षीही गणेशोत्सव उत्सव निर्बंधातच साजरा करावा लागण्याची शक्यता आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना तसे संकेत दिले आहेत.
मोठी बातमी! पुण्यात निर्बंध शिथिल; अजित पवारांच्या बैठकीनंतर निर्णय
गणेशोत्सवासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर निर्णय घेण्यात येईल असे सांगतानाच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गणेशोत्सव निर्बंधातच साजरा करावा लागेल असे संकेत दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस व पंढरपूरचा दाखला देत पवार म्हणाले जिथं मोठ्या प्रमाणावर गर्दी होते तिथं पॉझिटिव्हिटी रेट सात टक्क्यांच्या आसपास आहे. तर जिल्ह्यातल्या अन्य ठिकाणी जिथं गर्दी नव्हती तिथं हा दर एक टक्क्याच्या आत आहे. त्यामुळे उत्साहाला आवर घालण्याची गरज असल्याचं पवार म्हणाले.
मागणी मान्य, उद्यापासून पुणे अनलॉक !
– सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु राहणार
– हॉटेल रात्री १० पर्यंत सुरु ठेवता येणार
– शनिवार-रविवार सर्व सेवांना दुपारी ४ पर्यंत परवानगी
– मॉल रात्री ८ पर्यंत सुरु ठेवता येणार, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) August 8, 2021
“ठाकरे सराकरकडून हिंदूंमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्याचं काम”
दरम्यान रविवारीच भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुंबईतील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. गणेश मंडळांना राज्य सरकारच्या निर्बंधांमुळे कोणत्या अडचणींना तोंड द्यावं लागत आहे, याबाबत राज्यपालांना माहिती देण्यात आली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना, “हिंदूंमध्ये भितीचं वातावरण निर्माण करण्याचं काम ठाकरे सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. मेट्रो, बेस्टच्या कार्यक्रमात करोना दिसत नाही का? ” अशी टीका यावेळी त्यांनी केली.
पुणे-पिंपरी चिंचवडकरांना दिलासा
पुण्यातील सर्व दुकानं एक दिवस वगळता सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसंच पुण्यातील हॉटेल-रेस्तराँ सर्व दिवस रात्री १० पर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. मॉल रात्री ८ पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण मॉल्समध्ये फक्त दोन लस घेतलेल्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. तर हॉटेल चालक आणि दुकानदारांना लशीचे दोन्ही डोस घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे. पुण्यातील सर्व उद्यानं नियमित वेळेनुसार सुरु राहणार असून जलतरण तलाव वगळता इतर आऊटडोअर खेळांना परवानगी देण्यात आली आहे. यावेळी अजित पवारांनी सात टक्क्यांच्या पुढे पॉझिटिव्हीटी रेट गेल्यास पुन्हा निर्बंध लागणार असा इशारा पुणेकरांना दिला असून मास्क वापरणं बंधनकारक असल्याचं अधोरेखित केलं आहे.
In Pune&Pimpri Chinchwad, shopping malls to remain open till 8pm on all days but entry will be only allowed to those who’re fully vaccinated. Complete staff in the mall must be vaccinated. Indoor&outdoor activities/sports to remain open on all days:Maharashtra Minister Ajit Pawar
— ANI (@ANI) August 8, 2021
दरम्यान पुणे ग्रामीणमध्ये अद्यापही पॉझिटिव्हीटी रेट जास्त असल्याने तिथे लेव्हल तीनचे नियम लागू असणार आहेत. पुणे ग्रामीणमध्ये दुकानं, आस्थापने दुपारी ४ पर्यंतच सुरु राहतील. तर हॉटेल, रेस्तराँला दुपारी ४ पर्यंतच परवानगी देण्यात आली आहे.